बँकेत FD करणार्‍यांसाठी खुशखबर ! आता मिळेल जास्त व्याज, इथं चेक करा नवे रेट्स

नवी दिल्ली : जर तुम्ही सुद्धा बँक एफडी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने फिक्स्ड डिपॉझिटच्या व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने व्याजदरात 0.2 टक्केची वाढ केली आहे. या वाढलेल्या व्याजाचा फायदा त्या ग्राहकांना मिळेल, जे किमान दोन वर्षांसाठी एफडी करतील.

आता इतके झाले व्याजदार
कॅनरा बँकेनुसार, या वाढीनंतर किमान 2 वर्ष आणि 3 वर्षापेक्षा कमीच्या मॅच्युरिटीच्या एफडीवर आता 5.4 टक्के व्याज मिळेल. अगोदर हा व्याजदर 5.2 टक्के होता. याशिवाय 3 ते 10 वर्षांच्या मॅच्युरिटीच्या एफडीवर व्याजदर 5.3 वरून वाढवून 5.5 टक्के केला आहे.

नवीन दर 27 नोव्हेंबरपासून प्रभावी
बँकेकडून जारी वक्तव्यानुसार, सुधारित दरात ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का व्याज जास्त मिळेल. नवीन दर 27 नोव्हेंबरपासून प्रभावी होतील. व्याजदरात दुरूस्तीनंतर 2 ते 10 वर्षांच्या मॅच्युरिटी पीरियडच्या फिक्स्ड डिपॉझिटवर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये कॅनरा बँक सर्वात जास्त व्याज देत आहे.

एचडीएफसीने कमी केले व्याजदर
प्रायव्हेट सेक्टरमधील एचडीएफसी बँकेने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँकेने काही कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात कपात केली आहे. बँकेने व्याजदरात 0.20 टक्केची कपात केली आहे. बँकेच्या 1 वर्षाच्या डिपॉझिटवर व्याजदर 0.20 टक्के कमी करण्यात आला आहे. तर, 2 वर्षाच्या डिपॉझिटवर बँकेने व्याजदर 0.10 टक्के कमी केला आहे.

नव्या रेटनुसार, एचडीएफसी बँक 7 दिवस ते 29 दिवसांच्या डिपॉझिटवर 2.50 टक्के व्याज ऑफर करत आहे. 30-90 दिवसात मॅच्युअर होणार्‍या डिपॉझिटवर हा रेट 3 टक्के आहे.