पाकची आर्थिक रसद तोडणे हे अमेरिकेला उशीरा सुचलेले शहाणपण : शिवसेना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

दहशतवादविरोधी लढाईतील मित्र म्हणून अमेरिकेने मागच्या पंधरा वर्षांत पाकिस्तानच्या झोळीत तब्बल सवादोन लाख कोटींची आर्थिक मदत टाकली आहे. एवढी मोठी खंडणी वसूल करूनही पाक अमेरिकेला सतत मूर्खच बनवत आला आहे. अखेर भ्रमाचा भोपळा फुटल्यानंतर उशिरा का होईना, पाकची आर्थिक रसद रोखण्याचे शहाणपण अमेरिकेला सुचले, असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातील अग्रलेखात म्हटले आहे.

[amazon_link asins=’B0756Z43QS,B0756VRJ25′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ddd0fcfa-aff1-11e8-af96-b51444efa5c9′]

पाकिस्तान हा देश नसून ती एकप्रकारे खंडणी उकळणारी टोळीच आहे अशी टीका शिवसेनेने केली आहे. पाकिस्तानची आर्थिक रसद रोखण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचे कौतुक करायला हवे. अमेरिकेसारख्या महासत्तेला हे शहापण उशिरा सुचले असले तरीही ते सुचले हे महत्त्वाचे आहे. पाकिस्तान हा एक देश नसून एक प्रकारे ती खंडणी उकळणारी टोळीच आहे याची जाणीव उशिरा का होईना अमेरिकेला झाली हे बरेच झाले म्हणायचे.

आम्ही अमेरिकेच्या मागण्या एकतर्फी मान्य करणार नाही. पाकिस्तानच्या हिताला बाधा आणणारे सर्व करार रद्द करू असा इशारा इम्रान खान यांनी पत्रकार परिषद घेऊन एक दिवस आधीच दिला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या अमेरिकेने आर्थिक मदतीचा निर्णय रद्द करून इम्रान खान यांच्या डरकाळीतली हवाच काढून घेतली.

[amazon_link asins=’B01DEWVZ2C,B01J82IYLW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’013fe0aa-aff2-11e8-9470-35441595af98′]

पाकिस्तानच्या निर्मितीपासून अगदी कालपर्यंत वेगवेगळ्या गोंडस नावाखाली अमेरिका पाकिस्तान्यांची घरे भरत होती. मात्र अव्याहत सुरू असलेली ही रसद थांबवून पाकिस्तानचे नाक दाबण्याचे धोरण आता जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने स्वीकारलेले दिसते, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

अन् भारतीय बॉक्सरच्या ठोशाला घाबरून पाकिस्तानी महिला बॉक्सर मैदान सोडून पळाली

पाकिस्तान अजूनही अतिरेक्यांना संरक्षण देत आहे. त्यामुळे अमेरिकेकडून पाकिस्तानला दिली जाणारी ३० कोटी डॉलर्सची आर्थिक मदत रद्द करण्यात आली आहे अशी ताजी घोषणा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने केली आहे. त्यामुळे तब्बल २१३०  कोटी रुपयांचे हे घबाड पाकिस्तानच्या हातून निसटले आहे. लष्कराच्या पाठिंब्यावर नुकतेच पाकिस्तानचे पंतप्रधान झालेले इम्रान खान या निर्णयामुळे गोंधळून गेले आहेत. सलामीला फलंदाजीला यावे आणि पहिलाच चेंडू नाकावर आदळावा अशी काहीशी परिस्थिती अमेरिकेच्या या बाऊन्सरमुळे इम्रान यांची झाली आहे, असे या अग्रलेखात म्हटले आहे.