Cancer | दारू पिणार्‍यांनी व्हावे सावध, कॅन्सरबाबत समोर आला भितीदायक रिपोर्ट; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Cancer | दारू आणि कॅन्सरमध्ये कनेक्शन दाखवणार्‍या एका स्टडीवरून डॉक्टरांनी लोकांना सावध केले आहे. या स्टडीनुसार, 2020 मध्ये अल्कोहलच्या सेवनाने कॅन्सर (Cancer) झाल्याची साडेसात लाखापेक्षा जास्त प्रकरणे नोंदली गेली. या कालावधीत अमेरिकन लोक जास्त दारू पित असल्याचे दिसून आले.

लॅन्सेट ओंकॉलॉजीच्या एडिशनमध्ये 13 जुलैला प्रकाशित या स्टडीनुसार, 2020 मध्ये समोर आलेली कॅन्सरची 4 टक्के प्रकरणे एकट्या अल्कोहोलमुळे वाढली आहेत. दारूच्या सेवनाशी संबंधीत कॅन्सरची बहुतांश प्रकरणे त्या लोकांमध्ये आढळली ज्यांनी एका दिवसात दोनपेक्षा जास्त ड्रिंक घेतले. संपूर्ण जगात एक लाखापेक्षा जास्त लोकांमध्ये याची सरासरी सुद्धा कमी होती.

नॉर्थ-वेस्टर्न मेडिसिनमध्ये एक थोरेसिक सर्जन डॉक्टर डेविड ओडेल यांच्यानुसार, अल्कोहल एक उत्तेजक पदार्थ आहे. तो आपल्या तोंडाची लायनिंग, घसा, पोटासाठी समस्या वाढवते. आपले शरीर आपल्या जखमा बर्‍या करण्याचा प्रयत्न करते. परंतु अनेकदा ते असामान्य प्रकारे त्या बर्‍या करण्याचा प्रयत्न करते ज्यातून कॅन्सरची सुरूवात होऊ शकते.

दारूशी संबंधीत कॅन्सरची 75 टक्के प्रकरणे पुरुषांमध्ये दिसून आली.
बहुतांश प्रकरणात अल्कोहलने होणार्‍या कॅन्सरचा संबंध लिव्हर आणि घशापासून पोटापर्यंत जाणार्‍या नलिकेसोबत दिसून आला आहे. तर महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर जास्त कॉमन होता.

महामारी दरम्यान दारूचा खप जास्त वाढलेला असताना हे नवीन संशोधन समोर आले आहे.
मागील वर्षीसुद्धा अमेरिकन लोकांनी हे मान्य केले होते की, माहामारी दरम्यान त्यांचे दारू पिण्याचे व्यसन जास्त वाढले.

Web Title :- Cancer | alcohol consumption linked to nearly 750000 cancer cases in 2020 amid pandemic says study

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Male Contraception | पुरुषांसाठी ‘कंडोम’ला नवीन पर्याय, चुंबकाने स्पर्म होतील ‘कंट्रोल’; जाणून घ्या

Male Contraception | पुरुषांसाठी ‘कंडोम’ला नवीन पर्याय, चुंबकाने स्पर्म होतील ‘कंट्रोल’; जाणून घ्या

Mumbai Police Dance | ‘आया है राजा…’ या गाण्याचा ठेका धरत मुंबईतील पोलिसाचा डान्सचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल