कर्करोग जनजागृती : एक कदम कॅन्सर से बचाव की ओर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मेडिकल विंग, ब्रह्मकुमारी व फॉगसी आणि आयएमए, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक कदम कॅन्सर से बचाव की ओर’ हा कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमा अंतर्गत सकाळी वॉकेथान व प्रमिलाताई ओक हॉल येथे संगीतमय व्यायाम करण्याची प्रात्यक्षिके देण्यात आली.

महिलांना होणाऱ्­या स्तन, गर्भाशय आदींच्या कॅन्सरबद्दल डॉ. आशा निकते, डॉ. भारती राठी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोगावर नियंत्रण कसे मिळवावे, याबाबत डॉ. मीनाक्षी मोरे यांनी मार्गदर्शन केले. वर्षा दीदी यांनी ‘राजयोगचा स्वाथ्यावर होणारा परिणाम’ या बद्दल माहिती देऊन मेडीटेशनची अनुभुती करवली. कार्यक्रमाला आशा मालिवाल, डॉ. नीता गांधी, डॉ. अनिता खंडेलवाल, डॉ. साधना लोटे यांची उपस्थिती लाभली. प्रस्तावना डॉ. कल्पना भागवत यांनी केली. डॉ. शशिकांत मोरे, डॉ. रणजित देशमुख, डॉ. अजयसिंग चव्हाण, ब्र. कु. संस्थेच्या शाखा प्रमुख यांचे विशेष सहकार्य लाभले. उपस्थित विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संचालन प्रिया दीदी यांनी, तर आभार अर्चना दीदी यांनी मानले.