फक्त २ रुपयांत कॅन्सरवर बरा करा, एका डॉक्टरचा दावा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कॅन्सर सारख्या आजाराव अजूनही हुकमी इलाज नाही. जगभरातील शास्त्रज्ञ यासाठी अनेक वर्षांपासून झटत आहेत. दरवर्षी या आजाराने मरण पावणारांची संख्य लाखोंच्या घरात आहे. शिवाय, कॅन्सरसारख्या आजारावरील उपचारदेखील महागडे आहेत. लाखो रूपये हा आजार बरा करण्यासाठी मोजावे लागतात. गोरगरिबांना हा रोग झाल्यास त्याचे काही खरे नसते. असे असताना इटलीतील एक प्रसिद्ध डॉक्टर टूलिओ सिमोनचिनी यांनी कॅन्सरवर अवघ्या २ रुपयांत उपचार शक्य असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली आहे.

खाद्यपदार्थांमध्ये वापरला जाणारा बेकिंग सोडाने कॅन्सरवर उपचार केला जाऊ शकतो, असा दावा डॉक्टर सिमोनचिनी यांनी केला आहे. डॉ. सिमोनचिनी यांनी या दाव्याला बळकटी देण्यासाठी म्हटले आहे की, मी शेकडो रुग्णांवर अशा प्रकारे उपचार केले असून या पद्धतीने कुठल्याही स्टेजच्या कॅन्सरवर उपचार करता येतो. मी उपचारात सर्वच रुग्णांना १०० टक्के फायदा झाला आह. ही थेरेपी पूर्णपणे सुरक्षित असून त्याचा आरोग्यावर कुठलाही वाइट परिणाम होत नाही. बेकिंग सोडाच्या मदतीने आम्ही अनेक रुग्णांवर अवघ्या १० दिवसांत उपचार केले आहेत. रूग्ण कॅन्सरच्या कुठल्याही स्टेजचा असला तरी शंभर टक्के उपचार केले जाऊ शकतात. कॅन्सरच्या अनेक प्रकारांचे कारण फंगस असते. हा फंगस बेकिंग सोडाने रोखला जाऊ शकतो. बाहेरून असणाऱ्या कॅन्सरच्या जखमांना बेकिंग सोडा लावता येईल. फंगस शरीरितील रोग प्रतिकारक क्षमता कमी करतात. अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की, कॅन्सर हा कॅन्डिडा नावाच्या फंगसमुळे होतो. कालांतराने शिरा आणि धमण्या कमकुवत होतात. आणि अज्ञात शिरा तयार होऊ लागतात. कॅन्सर एक अल्सरचेच स्वरूप आहे.

डॉ. टूलिओ म्हणतात, सामान्य अ‍ॅन्टी फंगल औषधी कॅन्सर विरोधात लढू शकत नाहीत. कारण त्या औषधी फक्त शिरांच्या वरच्या स्तरावरच उपचार करतात. मुख्य इन्फेक्शन बॅक्टेरियापेक्षा अधिक घातक आणि शक्तीशाली असते. त्यामुळेच, फंगल इन्फेक्शन कित्येक दिवस शरीरात तसेच राहते. प्रामुख्याने स्किन कॅन्सरसाठी बेकिंग सोडा आणि आयोडीन टिंचर सर्वात उपयोगी आहे. अनेक संशोधनांमध्ये बेकिंग सोडाने इंटासेल्युलर अ‍ॅक्शन केले आहे. मी २० वर्षांपासून माझ्या रूग्णांवर याद्वारे उपचार करत आहे. त्यामध्ये असेही काही रोगी होते ज्यांनी कॅन्सरची शेवटची स्टेज गाठली होती. आता उपचार शक्य नाही असे त्यांना सांगण्यात आले होते. अशा रूग्णांवरही बेकिंग सोडाने उपचार यशस्वी झाले आहेत. ट्यूमर नष्ट करण्यासाठी बेकिंग सोडा सर्वात चांगला पर्याय आहे, असा दावा टूलिओ यांनी केला आहे.