Cancer Causing Oils | अनेक प्रकारच्या कॅन्सरचे मूळ आहेत ‘ही’ 4 कुकिंग ऑईल, तुमच्या घरातील जेवण याच्यात तर बनत नाही ना?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Cancer Causing Oils | कर्करोग (Cancer) हा प्राणघातक आजार आहे. कॅन्सरची लक्षणे (Symptoms Of Cancer) लवकर दिसली तर योग्य उपचार करता येतात, असे मानले जाते. ती ओळखण्यास उशीर झाल्यास, हळूहळू शरीर कमकुवत होऊन मृत्यू होतो. दुर्दैवाने, कॅन्सरची अनेक कारणे (Causes Of Cancer) आहेत, ज्यात तुमच्या जेवणात वापरल्या जाणार्‍या स्वयंपाकाच्या तेलाचा समावेश आहे (Cancer Causing Oils).

 

अर्थात, स्वयंपाकासाठी तेल आवश्यक आहे, परंतु आजकाल लोक मोठ्या प्रमाणात तेल वापरत आहेत. हल्ली तळलेले पदार्थ खाण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. असे मानले जाते की तेल शरीरातील पीएच संतुलन (PH Balance) बिघडवते आणि लिव्हर, पचनाचा अल्सर, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल, बद्धकोष्ठता आणि मूळव्याध (Liver, Digestive Ulcers, Obesity, Cholesterol, Constipation And Piles) यांसारख्या समस्या निर्माण करू शकते.

 

काही संशोधनात असे दिसून आले आहे की, लोणी आणि सॅच्युरेटेड फॅटच्या (Butter And Saturated Fat) तुलनेत दररोजच्या स्वयंपाकात वापरण्यात येणारी काही वनस्पती तेले (Vegetable Oils) आरोग्यासाठी जास्त घातक ठरू शकतात. आम्ही तुम्हाला काही रोज स्वयंपाकात वापरल्या जाणार्‍या वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे एक नाही तर अनेक प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो (Cancer Causing Oils).

 

कोणत्या तेलामुळे वाढतो कॅन्सरचा धोका (Which Oil Increases The Risk Of Cancer)
असे मानले जाते की, गरम झाल्यानंतर कॉर्न, सूर्यफूल, पाम आणि सोयाबीन तेल (Corn, Sunflower, Palm And Soybean oil) अल्डीहाईड्स (Aldehydes) नावाचे रसायने सोडते. हा धोकादायक घटक आहे जो विविध कर्करोगांशी संबंधित आहे. काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की विषारी संयुगे रेटिनल्डिहाईडच्या ऑक्सिडेशनला प्रोत्साहन देऊ शकते आणि ते रेटिनोईक अ‍ॅसिडमध्ये बदलू शकते. ते बदल्यात कॅन्सरच्या पेशींना जन्म देऊ शकते.

तेलामुळे का वाढतो कर्करोगाचा धोका (Why Does Oil Increase The Risk Of Cancer)
वास्तविक, तेलामध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण (Polyunsaturated Fat Level) जास्त असते.
तेल गरम झाल्यावर ते अल्डीहाइड्समध्ये विघटीत होते. यामुळेच तेल गरम केल्यावर त्याला दुर्गंधी येते.
असे असले तरी गरम तेल खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

 

व्हेजिटेबल ऑईलमध्ये कॅन्सरची तत्व (Cancer Principle In Vegetable Oil)
डिमॉनफोर्ट युनिव्हर्सिटीने केलेल्या संशोधनात, संशोधकांना असे आढळून आले की वनस्पती तेलात तळलेल्या पदार्थांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शिफारस केलेल्या दैनंदिन प्रमाणापेक्षा 200 पट जास्त अल्डीहाईड्स असतात.

 

ऑलिव्ह ऑइलमुळे कर्करोगाचा कमी धोका (Olive Oil Lowers The Risk Of Cancer)
विशेष म्हणजे ऑलिव्ह ऑईल, फॅट आणि लोण्यामध्ये अल्डीहाईड्सचे प्रमाण खूपच कमी असल्याचे या अभ्यासात आढळून आले आहे,
ज्यामुळे ते कर्करोगाचा धोकाही कमी करतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Cancer Causing Oils | according to research 4 types of cooking oil can cause several type of cancer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Navneet Rana-Ravi Rana | राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला; ‘या’ तारखेला होणार पुढील सुनावणी

 

MP Navneet Rana | पोलीस कोठडीत हीन वागणूक दिल्याचा नवनीत राणांचा आरोप, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी स्पष्टच सांगितलं

 

Hair Spa Treatment Benefits | केसांना अधिक सुंदर अन् चमकदार बनवण्यासाठी घरीच करा हेअर स्पा; जाणून घ्या सोपी पद्धत