भारतातील ‘या’ गावात जवळपास प्रत्येक घरात कॅन्सरचा रूग्ण, ‘या’मुळं झाला खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील एका गावात आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे. या गावात प्रत्येक पाच घरांमागे एक कॅन्सरने ग्रस्त रुग्ण आढळून येत आहे. आतापर्यंत या गावात गेल्या पाच वर्षांमध्ये 35 हून अधिक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. भोजाखेडी गावातील हा धक्कादायक प्रकार असून 200 कुटुंब असलेल्या या गावची लोकसंख्या 1900 च्या आसपास आहे.

आत्ता सुद्धा गावामध्ये अनेक लोक कॅन्सरने पीडित आहेत. एवढेच नाही तर या गावच्या महिला सरपंच आणि जिल्हा पंचायतीच्या माजी अध्यक्षांचा मृत्यू देखील कॅन्सरच्याच आजाराने झालेला आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जलसंधारण आणि पदोन्नती या विषयावर नुकतीच आयआयएम इंदूरच्या 48 विद्यार्थ्यांची टीम अभ्यास करण्यासाठी आली तेव्हा ही बाब उघडकीस आली. 14 ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांच्या गटाने थांबवून भोजाखेडी येथे चौपाल लावला. यावेळी, हा प्राणघातक रोग असल्याचे उघड झाले. या विद्यार्थ्यांच्या समूहाने याबाबतचा अहवाल देखील कलेक्टरकडे सुपूर्त केला आहे.

विद्यार्थ्यांनी दिलेल्या अहवालानुसार पाण्यात असलेल्या गडबडीमुळे अनेकांना कॅन्सर सारखा आजार झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कलेक्टरने बोअरवेल आणि विहिरींच्या पाण्याबाबत माहिती दिली आहे. येथील आमदार मनोज चावला यांनी देखील मध्य प्रदेशचे आरोग्य मंत्री तुलसी सिलावट यांना पत्र लिहून याबाबतची माहिती दिली आहे.

हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा प्रशासनाद्वारे पाठवण्यात आलेली एक टीम गावात सध्या तपास करत केला आहे आणि याबाबतचा अहवाल येत्या 15 दिवसात जमा केला जाणार आहे. या टीममध्ये जिल्हा रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजचे तज्ञ होते.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/