Cancer | सहावेळा ‘कॅन्सर”ला हरविले, पण हिम्मत नाही हारली; डोळ्यात पाणी आणणारी तरूणाची कहाणी
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Cancer | ‘कॅन्सर’ म्हंटले की सर्वप्रथम आपण हिम्मत हारतो कारण याला जीवघेणा आजार असं म्हंटल जातं. परंतू राजस्थानच्या अजमेरमधील एका तरूणाने याच आजाराला एक नाही, दाेन नाही, तर तब्बल सहावेळा हारविले आहे. त्याने आपल्या आत्तापर्यंतच्या अनुभवांवर तीन पुस्तके लिहली आहेत. एवढंच नाही तर त्याने अनुभव सांगणारे एक अॅप देखील विकसित केले आहे जे 10 लाखपेक्षा जास्त लोकांनी डाऊनलोड केले आहे. (Cancer)
राजस्थानातील अजमेर शहरात जन्मलेल्या 25 वर्षीय जयंत कंदोई नावाच्या तरूणाला वयाच्या 15व्या वर्षी पहिल्यांदा गळ्याच्या वर कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. त्यावेळी तो दहावीच्या परीक्षेची तयारी करत होता. त्याचे कुटुंब पूर्णपणे निराशेच्या गर्तेत गेले परंतू त्याने हिम्मत हारली नाही. जयपूरला तात्काळ उपचार सुरू केले. त्याला बारा केमोथेरपी देण्यात आल्या. आश्चर्य म्हणजे त्याने या दरम्यान ही आपला दहावीचा अभ्यास सुरू ठेवला आणि शाळेत अव्वल आला. यशस्वी उपचारांनंतर तो सामान्य जीवन जगत होता पण दोन वर्षांनी त्याला दुसर्यांदी कॅन्सर झाला. त्याही वेळेस जयंत नव्या उमेदीने उभा राहिला आणि कॅन्सरचा सामना केला. दुसर्यावेळेस त्याला 60 रेडिओथेरपी देण्यात आल्या. त्यानंतर सन 2017 पोटाचा, सन 2020 मध्ये उजव्या हाताच्या बाजूला आणि पोटात असं दोनदा जयंतला कॅन्सरचे निदान होत गेले पण, दरवेळेस तो त्याच हिम्मतीने आणि सकारात्मक विचारांनी त्याचा सामना करत गेला. स्वत:ला सांभाळण्याबरोबर त्याने आपल्या कुटुंबालाही सांभळले. त्यांना ही धीर देऊन सगळ्या परिस्थितीशी लढण्याची ताकद दिली. (Cancer)
तीन पुस्तकांमधून केले अनुभव कथन
जयंत ने कॅन्सरसोबत केलेल्या संघर्षातून जे अनुभव आले त्यांची शिदोरी कॅन्सर रूग्णांसाठी तीन पुस्तकांच्या माध्यमातून आणली आहे.
तसचे तो एक एनजीओ सिटी स्टार क्लब चालवतो ज्याच्या माध्यमातून कॅन्सर रूग्णांचे मनोबल वाढवण्याचे, त्यांना हिम्मत देण्याचे काम केले जाते.
याशिवाय त्याने एक अॅप ही डेव्हलप केले आहे जे आत्तापर्यंत 10 लाखपेक्षा जास्त लोकांनी डाऊनलोड केले आहे.
खरोखरी जयंतची जगण्याप्रती असलेली जिद्द सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
Web Title :- Cancer | jayant kandoi beat cancer 6 times wrote 3 books started ngo in ajmer
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Shahajibapu Patil | ‘काय दारु…काय चकणा.. समदं कसं ओके’, युवासेनेचा शहाजीबापूंना टोला
Pune Pimpri Crime | गैरवर्तन करुन महिलेला जीवे मारण्याची धमकी, विनयभंग करणाऱ्या घरमालकावर FIR