Cancer Treatment | शास्त्रज्ञांचा दावा – एक्सरसाईज सोबत खा ‘या’ 2 स्वस्त गोष्टी, कॅन्सरचा धोका 70% होईल कमी; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Cancer Treatment | कॅन्सर (Cancer) हा एक जीवघेणा आजार असून त्यावर योग्य वेळी उपचार न केल्यास मृत्यूचा धोका असतो. खरे तर कुणालाही अचानक कॅन्सर होत नाही. यामुळे शरीर हळूहळू जखडते आणि ते कमकुवत होते. कॅन्सरची अनेक कारणे (Causes Of Cancer) आहेत ज्यात खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि काही वाईट जीवनशैलीचा (Wrong Habits And Bad Lifestyle) समावेश आहे. कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी निरोगी आहार आणि सक्रिय जीवनशैली आवश्यक आहे (Cancer Treatment).

 

एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की व्हिटॅमिन डी आणि ओमेगा -3 (Vitamin D And Omega-3) च्या हाय डोससह, घरी साध्या व्यायामासह, 70 किंवा त्याहून जास्त वयाच्या निरोगी प्रौढांमध्ये कॅन्सरचा धोका 61 टक्क्यांनी कमी करण्यास मदत होते (Cancer Treatment).

 

हा अभ्यास फ्रंटियर्स इन एजिंगमध्ये प्रकाशित झाला आहे. संशोधकांचा असा विश्वास आहे की हे तीन उपाय कॅन्सर रोखण्यासाठी प्रभावी ठरले आहेत आणि हा अशा प्रकारचा पहिला अभ्यास आहे.

 

या तीन गोष्टी कॅन्सरला कशा प्रकारे करतात प्रतिबंध (How These 3 Things Prevent Cancer)
अभ्यासातून असे दिसून आले आहे की व्हिटॅमिन डी कॅन्सरच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करते. त्याचप्रमाणे, ओमेगा -3 सामान्य पेशींचे कॅन्सरच्या पेशींमध्ये रूपांतर रोखू शकते आणि व्यायामामुळे इम्युनिटी सुधारते आणि सूज कमी होते, ज्यामुळे कर्करोग रोखण्यात मदत होऊ शकते.

कसे केले संशोधन (How Was The Research Done) ?
बिशॉफ-फेरारी आणि सहकार्‍यांनी 70 किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डी3 आणि ओमेगा -3 च्या हाय डोससह साध्या घरगुती व्यायामाच्या मिश्रणाच्या प्रभावाची चाचणी केली.
स्वित्झर्लंड, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया आणि पोर्तुगाल येथे आयोजित तीन वर्षांच्या चाचणीमध्ये 2,157 जण सहभागी होते.

 

काय होते निष्कर्ष (What Was The Conclusion)
संशोधनाचे निष्कर्ष असे सूचित करतात की सर्व तीन उपचार (व्हिटॅमिन डी3, ओमेगा -3 आणि व्यायाम) आक्रमक कॅन्सरच्या जोखमीवर लाभदायक आहेत.
प्रत्येक उपचाराचा एक लहान वैयक्तिक फायदा होता परंतु जेव्हा सर्व तीन उपचार एकत्र केले गेले
तेव्हा संशोधकांना कॅन्सरच्या जोखीममध्ये 61 टक्के घट दिसून आली.

 

कॅन्सर टाळण्यासाठी इतर मार्ग (Other Ways To Prevent Cancer)
स्वित्झर्लंडमधील युनिव्हर्सिटी हॉस्पिटल झुरिचचे डॉ. हेके बिशॉफ-फेरारी (Dr. Heike Bischoff-Ferrari) यांच्या मते,
कॅन्सर टाळण्यासाठी इतर प्रभावी मार्गांमध्ये धूम्रपान न करणे आणि सूर्यापासून संरक्षण करणे समाविष्ट आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Cancer Treatment | according to new research vitamin d omega 3 and exercises may reduce cancer risk 70 percent

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mint Tea Benefits | रोज प्यायलात पुदीन्याचा चहा, तर होतील ‘हे’ 3 आश्चर्यकारक फायदे

 

Type 2 Diabetes | ब्लड शुगर ठेवायची असेल कंट्रोल तर ‘या’ एका गोष्टीपासून रहा दूर; जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला

 

Headache In Summer | उन्हाळ्यात डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर ‘हे’ 5 घरगुती उपाय करून पाहा