‘खुशखबर’ ! ‘गरीब सवर्णां’ना आरक्षण मिळाल्यानंतर आता सरकारी नोकरीत देखील ‘वयोमर्यादेत’ सूट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने आर्थिक मागासलेल्यांना आधार म्हणून देशातील गरीब सवर्णांतील उमेदवारांना सरकारी नोकरीत १० टक्के आरक्षणाचा लाभ दिला होता. मात्र त्यांना इतर मागास वर्ग आणि एस.सी., एस.टी. समाजाप्रमाणे स्पर्धा परिक्षेत वयाच्या मर्यादेचा लाभ मिळत नव्हता. यामुळे सरकार गरीब सवर्ण उमेदवारांना वयाच्या मर्यादेत सूट देणार आहे. त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

वयाच्या मर्यादेत सूट मिळावी म्हणून पत्र

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांच्याकडून केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना पत्र लिहण्यात आले होते. यात आर्थिक रुपाने गरीब गटातील उमेदवारांना सरकारी नियुक्त्यांमध्ये वयात सूट मागण्यात आली होती.

अशी मिळेल सूट

इतर मागस वर्गाला वयोमर्यादेत ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे, तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची वय मर्यादा ५ वर्षापर्यंत सूट देण्यात येते. जर यूपीएससीच्या लोकसेवा परिक्षेचा विचार केला तर, यात ओपन मधील उमेदवारांना वयाची मर्यादा ३२ वर्ष आहे. तर ओबीसींसाठी वयाची मर्यादा ३५ वर्ष आहे आणि ए.सी., एस.टी.साठी वय मर्यांदा ३७ वर्ष आहे.

गुणात देखील मिळू शकते सूट

वयातील सूटी बरोबरच गरीब सवर्ण उमेदवारांना स्पर्धा परिक्षेत गुणात देखील सूट देण्यात येऊ शकते. कर्मचारी मंत्रालय या मुद्यावर विचार करु शकते. कारण दुसऱ्या प्रवर्गात देखील ही सुविधा देण्यात आली आहे. या निर्णयावर सरकार विचार करत आहेत. या निर्णयानंतर गरीब सवर्णांना सरकारी स्पर्धा परिक्षेत वयोमर्यांदेत सूट मिळेल. यामुळे गरीब सवर्णांना आता आधिक संधी मिळणार आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like