आगळावेगळा उमेदवार ! एका हातात ‘घडयाळ’ तर दुसर्‍या हातात ‘शिवबंधन’ बांधून प्रचार

वाशीम : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून अनेक राजकीय पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. उमेदवार देखील आपला प्रचार करताना दिसू येत असून काही उमेदवारांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारांनी पक्षबदल केल्याने मतदारांना कोण कोणत्या पक्षाचा उमेदवार आहे हे कळण्यास उशीर लागणार आहे.

मात्र याच प्रकारचा एक किस्सा वाशीम जिल्ह्यात घडला. येथील एक उमेदवार नक्की कोणत्या पक्षाचा याचा मतदारांना मेळच लागेना. येथील राष्ट्रवादी कांग्रेसच्या उमेदवाराच्या एका हातात घड्याळ असून एका हातात धनुष्यबाण आहे. त्यामुळे नेमका हा उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे. 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट कापल्यामुळे प्रकाश डहाके यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र आता या विधानसभा निवडणुकीत हि जागा भाजपला गेल्याने त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत तिकीट मिळवले खरे मात्र प्रचार सभेवेळी त्यांना शिवबंधन सोडून घड्याळ बांधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्याला नकार दिला.

दरम्यान, याविषयी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि, खूप काळापासून शिवसेनेजोबत जोडले गेल्याने मी शिवबंधन काढणार नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ कायं आमच्या हातात असेल असे त्यांनी म्हटले. त्यामुळे डहाके नेमके कोणत्या पक्षाचे अशी चर्चा सध्या मतदारसंघात सुरु आहे.

visit : policenama.com