पुलवामा हल्ल्यातील शहिद जवानांना सेंट अँथनी स्कूल कडून श्रध्दाजंली

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – सामाजिक कार्यात आपलाहि खारीचा वाटा असावा या प्रयत्नातून फादर विल्सन रॉड्रिक्स यांनी स्कूल मध्ये बैठक बोलवून आपल्या स्कूल मध्ये माजी सैनिकांची मुले शिकत आहे. पुलवामा येथील शहिदांना कँडल मार्च काढून अभिवादन करू. देश कार्यात सगळ्यांना सहभागी करण्यासाठी लोकांना माहिती मिळावी याबाबत देशाप्राती आदर असावा, देशासाठी आपण आपले जीवन समर्पित करू, देशभक्ती निर्माण करु. भारत माता कि जय, वंन्दे मातरम जय घोष करत कँडल मार्च मध्ये सहभागी होऊ. सगळ्यांनी बैठकीत होकारा देत कँडल मार्च मध्ये सहभागी होण्याचे आव्हान केले.

फादर रॉड्रीक्स यांनी केलेल्या आव्हानाला साथ देत. सेंट अँन्स स्कुल च्या परिवार वतीने गुरवारी सांयकाळी स्कूल पासून कँडल मार्चला सुरवात झाली. घोष वाक्यांनी व विविध वेशभूषा चिमूकल्यांनी साकारल्याने रँलीच्या माध्यमातून एक प्रकारे जवानाना प्रति आदरच व्यक्त केला जात होता. शहरातून रँली मार्गस्थ होत असताना साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती.

कँडल मार्च मध्ये एकूण 1950 जणांचा सहभाग होता. यात माजी सैनिका सह,700 विद्यार्थी,1200 पालक, व 50 शाळेतील कर्मचारी होते.टॉवर बगीचा,जे.बी.रोड,शहर पोलीस चौकी,जुना आग्रारोड,कराची वाला खुंट ,पारोळा रोड,झाशी राणी चौक,महानगर पालीका,परत स्कूल मध्ये कँडल मार्चची सांगता झाली. यावेळी स्कूल मधील मेरी प्रतिमेसमोर कँडल पेटत्या तेवत ठेऊन दोन मिनिटे स्तब्धता राखून शहिदांना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.