कोरोना, बर्ड फ्लू नंतर Parvovirus ने वाढवली डोकेदुखी, ‘या’ शहरात आढळली प्रकरणे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाने गेल्या वर्षभरापासून देशभरात थैमान घातले आहे. जरा मध्यंतरी जरा कुठे दिलासा मिळाला होता तर बर्ड फ्लूने डोके वर काढले होते. त्यात आता भर म्हणून पर्वोव्हायरसचा धोका निर्माण झाला आहे. बर्ड फ्लूनंतर आता उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पर्वोव्हायरसमुळे खळबळ उडाली आहे. त्याच्या प्राणघातक आजारामुळे 8 कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. 8 मेलेल्या कुत्र्यांपैकी दोन कुत्र्यांच्या शवविच्छेदनानंतर असे दिसून आले की त्यांचे आतडे सडले होते आणि मृत्यूच्या आधी कुत्र्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या.

पर्वोव्हायरस हा धोकादायक संसर्गजन्य विषाणू आहे. हे कुत्र्याच्या पिल्लांमध्ये आणि कुत्र्यांमध्ये एक संसर्गजन्य जीआय रोगाचा कारक आहे. जर त्यावर उपचार केले नाही तर ते प्राणघातक ठरू शकते. हा विषाणू धोकादायक मानला जातो कारण कुत्र्यांमध्ये तो सहज पसरतो. उत्तर प्रदेशातील कानपूरमधील भातरगाव ब्लॉकमधील केंटारा गावात या विषाणूच्या संसर्गामुळे कुत्र्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहेत. काही आठवड्यांपूर्वी त्याच गावात मोठ्या संख्येने कावळे मृत अवस्थेत आढळले होते.

बचावाचा उपाय
पशुवैद्यकीय तज्ञांचे एक पथक गावात संक्रमित कुत्र्यांमधील वर्तन बदलांविषयी जाणून घेण्यासाठी भेट देत आहे. त्याचे म्हणणे आहे की, विषाणू प्रामुख्याने आतड्यांवर परिणाम करतो. पशुवैद्य सर्वेंद्र सचान म्हणाले की, पर्वोव्हायरस मोठ्या प्राण्यांवर परिणाम करीत नाही, परंतु कुत्र्यांसाठी प्राणघातक असल्याचे सिद्ध करतो. संघातील आणखी एक पशु चिकित्सक, ओ.पी. वर्मा म्हणाले की ,कुत्र्यांना विषाणूपासून वाचवण्यासाठी आवश्यक ती लस जन्माच्या तीन महिन्यांत द्यावी.