काय सांगता ! होय, आता गांजा वाचवू शकतो कोरोनाग्रस्तांचा जीव, रिसर्चमधून दावा

पोलिसनामा ऑनलाईन – जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल ९ कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोनामुळे अनेक देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा काही ठिकाणी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनावर जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहेत. रिसर्चमधून वेगवेगळे खुलासे करण्यात येत आहेत. जगभरातील संशोधक कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि कोरोनाचा खात्मा करण्यासाठी कोणतं औषध परिणामकारक ठरेल याचा शोध घेत आहे. याच दरम्यान कॅनडामधील एका विद्यापीठाने एक कोरोनाबाबत एक महत्त्वाचा दावा केला आहे.

कोरोना तसेच इतर गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींवर गांजाचा अंश असणाऱ्या औषधांचा वापर करण्यास सुरुवात करता येईल असा खुलासा संशोधकांनी केला आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार कॅनडामधील लेथब्रिज विद्यापिठामधील संशोधकांच्या एका गटाने दावा केला आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका असणाऱ्या वयोगटातील आणि गंभीर आजार असणाऱ्यांना गांजाचा वापर करून वाचवता येऊ शकतं असा दावा केला आहे. या रिसर्चनुसार शरीरामधील रोगप्रतिकारशक्ती आणखी सक्षम करण्यासाठी गांजाचं सेवन करणं फायद्याचं ठरतं. मानवी शरीरामधील रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने शरीरामध्ये “सायटोकाइन स्टार्म” नावाची प्रक्रिया सुरू होते. यामुळे शरीरामधील निरोगी पेशींवरही परिणाम होतो. कोरोनाचा संसर्ग झालेल्या आणि इतर आजार असलेल्या अनेक रुग्णांचा याच कारणामुळे मृत्यू झाला आहे.

गांजाच्या पानांमध्ये आढळणारं तत्व या सायटोकाइन स्टार्मला थांबवू शकतं. सायटोकाइन स्टार्म निर्माण होण्यासाठी interleukin-6 म्हणजेच IL-6 आणि Tumour necrosis factor alpha म्हणजेच TNF-a ही दोन रसायनं कारणीभूत असतात. याच रसायनांचे प्रमाण गांजामधील तत्वाच्या मदतीने कमी करता येतं असं संशोधकांनी म्हटलं आहे. कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सुरू झाल्यापासूनच जगभरातील अनेक संशोधक सायटोकाइन स्टार्मचा प्रभाव कमी करण्यासाठी काय करता येईल याबद्दल संशोधन करत होते. एखादा विषाणू शरीरामधून नष्ट करण्यात आल्यानंतरही ही प्रक्रिया सुरू असते. अक्यूट रेस्पिरेट्री डिस्ट्रेस सिंड्रोम म्हणजेच एआरडीएसचा त्रास होऊ शकतो. या एआरडीएसमुळे मृत्यूही ओढावू शकतो. यामुळे लंग फ्रायब्रेसिसचा त्रासही होऊ शकतो. लंग फ्रायब्रेसिसमध्ये फुफ्फुसांच्या पेशी खराब होऊन फुफ्फुसं निकामी होतात. संशोधकांनी गांजामधील २०० वेगवेगळ्या स्ट्रेन्सचा अभ्यास केला. त्यापैकी सात स्ट्रेनवर त्यांनी सविस्तर संशोधन केलं. हे संशोधन ‘रिसर्च स्केयर’मध्ये प्री-प्रिंट करण्यात आलं आहे. यामध्ये तीन महत्वाचे स्ट्रेन संशोधकांना सापडले असून ते साइटोकाइन स्टार्मवर परिणामकारक ठरतील असं सांगितलं जात आहे.

स्ट्रेनला नंबर फोर, नंबर एट आणि नंबर फोर्टीन अशी नावं देण्यात आली आहेत. तसेच आता या स्ट्रेनचा वापर कोरोनाचा संसर्ग झाल्याने प्रकृती अत्यंत चिंताजनक असणाऱ्या आयसीयूमधील रुग्णांवर करण्याचा विचार केला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. चिंता, नैराश्य, झोप न येणं यासारख्या शरीराशी निगडीत असलेल्या गोष्टींवर उपचार करण्यासाठी “गांजा”चा वापर केला जात असल्याची माहिती मिळत आहे. विशेषत: प्रौढ मंडळी याचा वापर करत असल्याचं आढळून आलं आहे. निद्रानाश, चिंता, वेदना तसेच नैराश्य यासारख्या गोष्टींवर उपचार म्हणून गांजाचा वापर करण्यात येत असल्याची माहिती कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या (यूसी) सॅन डिएगो स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी दिली आहे.

अमेरिकन जेरियाट्रिक्स सोसायटीच्या जर्नलमध्ये हा रिसर्च ऑनलाईन प्रकाशित करण्यात आला आहे. काही प्रमाणात आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या गांजाचा वापर हा अनेक ठिकाणी केला जात आहे. या रिसर्चसाठी 568 रुग्णांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. वेदना, निद्रानाश आणि चिंता या कारणांसाठी गांजाचा वापर करणं ही सर्वात सामान्य कारणे होती अशी माहिती क्रिस्तोफर कॉफमन यांनी दिली आहे. गांजाचं सेवन करणाऱ्या काही मंडळींनी व्यसन म्हणून नाही तर आरोग्याशी संबंधित आजारांवर हे उपयुक्त ठरत असल्याने याचा वापर केल्याची माहिती दिली आहे. सर्व्हेक्षण करण्यात आलेल्या रुग्णांपैकी जवळपास १५ टक्के लोकांनी गेल्या तीन वर्षांत गांजाचा वापर केला होता. तर त्यातील निम्मे वापरकर्ते नियमितपणे गांजा आरोग्यासाठी उपयुक्त ठरत असल्याने त्याचा वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे. १० आठवड्यांच्या कालावधीत यूसी सॅन डिएगो हेल्थ येथील सीनिअर्स क्लिनिक फॉर सीनिअर्स क्लिनिकमध्ये हे सर्व्हेक्षण केले गेले. गांजाचा वापर करणाऱ्या ६१ टक्के रुग्णांनी वयाच्या ६० व्या वर्षांनंतर त्याचा वापर करण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळत आहे.