पर्यावरण दिनानिमित्त लावली चक्क गांजाची झाडं; फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सुरु केला तपास

केरळ / कोल्लम : वृत्तसंस्था – केरळ राज्यामधील (State of Kerala) कोल्लम जिल्ह्यातील मंगडजवळ कुरीशडी परिसरात 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्याऐवजी चक्क गांजाची झाडे (cannabis trees) लावण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनेक वेगवेगळी अशी झाडे लावली जातात त्याचे संवर्धन केले जाते. वाढवले जाते. परंतु, येथे गांजाचे झाडे (cannabis trees) लावले आहेत. याचे फोटो समाज माध्यमावर प्रसारित झाल्यानंतर केरळच्या उत्पादन शुल्क विभागाने (Excise Department) तपासाचा बडगा उगारला आहे.

Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,891 नवीन रुग्ण, तर 16,577 जणांना डिस्चार्ज

‘5 जून रोजी झालेल्या जागतिक पर्यावरण दिनानंतरच गांजाची झाडे (cannabis trees) लावली गेली.
कोल्लम जिल्ह्यातील (Kollam district) मंगडजवळ कुरीशडी जंक्शन ते बायपास रोडकडे जाणाऱ्या परिसरात ही झाडे लावण्यात आली आहेत.
परिसरातील राहत असलेल्या नागरिकांना संशय निर्माण होताच त्यांनी याबाबत माहिती अधिकाऱ्यांकडे दिली होती.
या माहितीवरून उत्पादन शुल्क पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आणि त्याची पाहणी केली. उत्पादन शुल्क विशेष पथकाचे मंडळ निरीक्षक टी. राजीव आणि त्यांच्या पथकाने पुढचा तपास सुरु केला.
परंतु, हे पथक येण्यापूर्वीच घटनास्थळावरुन गांजाची लावलेली झाडे काढून टाकली आहेत. याप्रकरणी उत्पादन शुल्क प्रतिबंध ऑफिसर एम. मनोज लाल, निर्मलन थांपी, बिनुलाल नागरी उत्पादन शुल्क ऑफिसर गोपाकुमार, श्रीनाथ, अनिलकुमार, ज्युलियन क्रूझ आणि चालक नितीन यांच्या पथकाने तपास सुरू केला आहे.

या दरम्यान, कुरीशडी परिसरात लावलेल्या गाजांच्या झाडांचे फोटो समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासाला सुरुवात केलीय.
गांजाची लावलेली झाडे व्हायरल झालेल्या फोटोत साधारण 30 ते 60 सेटींमीटर उंचीची झाडे असल्याचा संशय तेथील पोलिसांनी वर्तविला होता.
या प्रकरणावरून तेथील कांडाचिरा मधील एका व्यक्तीवर संशय व्यक्त केला जातोय.
याआधी त्याच व्यक्तीवर गांजाच्या तस्करी प्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती समजताच घातस्थळी धाव घेतली मात्र, तेथील झाडे काढून टाकली होती.

भारतात कायदा काय ?
भरात सरकारने 1985 मध्ये मादक पदार्थांची औषधे आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (NDPS) कायद्यांद्वारे गांजाच्या लागवडीवर बंदी घातली होती.
मात्र, या कायद्याने राज्य शासनाला औद्योगिक कारणांसाठी गांजाची नियमानुसार लागवड करण्यास परवानगी दिली आहे.
या वनस्पतीचा वापर चरस, गांजा बनवण्यासाठी होतोय.
वनस्पतीपासून बाजूला केलेल्या राळेचा वापर हिशिशच्या तेलाच्या निर्मितीसाठी देखील केला जातोय.
परंतु, इतर भागांचा वापर नशा करण्यासाठी केला जातो. म्हणून सरकारने यावर बंदी घातली आहे.

Also Read This : 

IBPS RRB PO/Clerk Notification 2021 | बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी ! 10466 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

 

Bribery | लाचखोरीच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकासह चौघे तडकाफडकी निलंबीत