‘कान चित्रपट महोत्सवात’ दीपिकाची धमाकेदार एन्ट्री, युजर्सने केले ट्रोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या खुपच चर्चेत आहे. प्रत्येक इव्हेंटमध्ये दीपिकाची धमाकेदार एन्ट्री असते. आपल्या अदाकारीने सर्वांनाच घायाळ करणारी दीपिका पादुकोणने पुन्हा एकदा आपली जादू दाखविली आहे.

View this post on Instagram

Cannes-17th May,2019. #Cannes2019

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

नुकताच झालेला ‘कान चित्रपट महोत्सवात’ दीपिकाने वेगळ्या अंदाजात एन्ट्री केली आहे. यामध्ये तिचा वेगळा लुक लोकांच्या समोर आला आहे. या महोत्सवात दीपिकाने ग्रीन कलरचा गाउन परिधान केला आहे. या ग्रीन कलरच्या गाउनमध्ये दीपिका खुपच सुंदर दिसत आहे. या ग्रीन गाउनमध्ये एन्ट्री करताना दीपिकाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ती स्टाईलिश अंदाजात चालताना दिसत आहे.

View this post on Instagram

#Cannes2019

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिकाचा हा अनोखा गाउन Giambattista Valli ने डिझाईन केला आहे. पिंक हेअरबॅंड दीपिकाच्या सौंदर्यामध्ये अजून भर घातल होता. तिचा मेकअप खुपच आकर्षित दिसत होता.

याआधी एका इव्हेंटमध्ये प्रियांका चोप्रा ही अनोख्या अंदाजात दिसून आली. त्यावेळी तिला युजर्सने खुपच ट्रोल केले होते. त्याचबरोबर तिची खिल्ली देखील उडविली होती. आता युजर्स ट्रोल करण्यासाठी दीपिकाकडे वळले आहे. दीपिकाच्या या सुंदर अनोख्या लुकलाही युजर्सने खुपच ट्रोल केले आहे. दीपिकाचा हा लुक काही चाहत्यांना खुप आवडला तर काहीना पसंत पडला नाही. यावरुन तिला अनेकांनी ट्रोल केले आहे.

काही युजर्सने ट्रोल करुन दीपिकाला असे म्हणाले की, ‘इतका छान गाउन परिधान करुन त्याचबरोबर मेकअप करुन देखील तु सुंदर का दिसत नाही’ ? तर एका युजरने तिला म्हणले की, हा ‘बाबा’ च्या संगतीचा परिणाम आहे. अजून एका युजरने तिला लिहले की, दीपिकाचा गाउन नाट्यमय आहे. मग यासोबत तिने हेअरबॅंड का लावला आहे? अशाप्रकारे दीपिकाला युजर्स कमेंट करत आहे.

Loading...
You might also like