Cannes 2019 : बॉलिवूड क्वीन कंगना रणौतची चक्क ‘कांजिवरम’ साडी नेसून धमाकेदार एन्ट्री !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत नेहमी सोशल मिडियावर चर्चेत असते. ती सतत आपले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. नुकत्याच झालेल्या ‘कान्स फिल्फ फेस्टिवल २०१९’ मध्ये कंगनाने सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात तिने गोल्डन कलरची साडी नेसली होती. कंगनाने आपल्या लुकला वेस्चन टच दिला होता. यासाठी तिने पर्पल कलरचे ग्लव्स कॅरी केले होते. या गोल्डन कांजीवरम साडीत कंगनाची स्टाईलिश हेअर स्टाईलही खास दिसत होती. एवढेच नाही तर तिने यासोबत काळा चष्मा देखील कॅरी केला होता.

 

‘कान्स फिल्फ फेस्टिवल २०१९’ मध्ये गोल्डन कलरच्या साडित कंगना खुपच सुंदर दिसत होती. कान्स लुकसाठी कंगनाने फाल्गुनी आणि शेन पिकॉक याच्या कस्टर कॉरसेटची निवड देखील केली होती. माधुर्य डिझाईन केलेल्या कांजीवरम साडित कंगनाने धमाकेदार एन्ट्री घेतली.

 

पॅरीसमध्ये सुरु असलेल्या कान्स फिल्म फेस्टिवल २०१९ साठी बॉलिवूड ललना ही सज्ज आहे. बॉलिवूड क्विन कंगना राणौत ही सुद्धा ललनाला टक्कर देताना दिसली. या फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर कंगनासोबत अनेकांनी ग्लॅरस वेस्टर्न आऊटफिटमध्ये एन्ट्री घेतली असताना कंगनाने मात्र या खास इंटरनॅशनल इव्हेंटसाठी इंडियन लूकची निवड केली होती.

 

कंगनाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कंगना ‘कान्स फिल्फ फेस्टिवल २०१९’ ची तयारी करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये कंगनाने वेगवेगळे पोज दिले आहे. प्रत्येक चाहत्यासोबत तिने फोटो काढले आहे. एकाही चाहत्याला तिने निराश केले नाही. फेस्टिवलमधील कंगनाचा लूक सगळ्यांच्या खुप पसंतीस पडला. सोशल मिडियावर तिचे खुप कौतुक झाले.

 

यामध्ये कान्स स्ट्रीटवरच्या एका ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटोत कंगनासोबत तिची बहिण रंगोली दिसत आहे. कंगना सध्या ‘मेंटल है क्या’ आणि ‘पंगा’ या दोन चित्रपटाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. याशिवाय ती जलललितांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे.