जेंव्हा प्रियंकाने पती निकला सोडून ‘या’ व्यक्ती सोबत काढला फोटो

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड अभिनेत्री सध्या २ दिवसापासून कान्स फिल्म फेस्टिवल २०१९ मध्ये चर्चेचा विषय बनल्या आहेत. कान्स मध्ये यावेळी कंगना रनौत, दीपिका पादुकोण, प्रियंका चोपड़ा, डिआना पेंटी अशा सगळ्या अभिनेत्री आल्या होत्या. या सगळ्या नायिकांमधून प्रियंका आणि हिना पहिल्यांदा कान्समध्ये पदार्पण करत आहेत आणि दोघेही अतिशय सुंदर दिसत आहेत.

प्रियंकाने निकसोबत कान्स मध्ये पदार्पण केले आणि त्यांचे दोघांचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आणि त्यावेळी प्रियंकाचा असा एक फोटो व्हायरल झाला की त्या फोटोवर अनेकांनी प्रश्न मांडले. त्या फोटो मध्ये प्रियंका निकसोबत नसून दुसरं कोणासोबत फोटो काढतांना दिसून आली म्हणून तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे.

खरंतर प्रियंका फोटोत ज्या व्यक्ती सोबत दिसून येत आहे ती व्यक्ती दुसरी कोणीनसून तिचा स्टाइलिस्ट संजय कुमारहाच आहे. विरल भयानीने त्यांचा इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो व्हायरल केला आणि सांगितले की कोण आहे ती व्यक्ती. विरलने फोटो शेयर करतांना लिहिले कि तो व्यक्ती कोणी नसून तिचा स्टाइलिस्ट संजय कुमार आहे.

प्रियंकाचा हा फोटो बघून अनेक जण कंमेंट पास करत आहे कोणी त्या व्यक्ती बद्दल जाणून घ्याचा प्रयत्न करत आहेत तर कोणी प्रियंकाला टॉन्ट मारत आहे. प्रियंकाचा हा फोटो रेड कार्पेटचा नव्हे तर कान्स च्या वेळी चालू असलेल्या पार्टीतिल आहे. त्यावेळी सुधा प्रियंका निकसोबत आली होती. त्यावेळी प्रियंकाने मेटैलिक ब्लैक डीप नेक गाउन घातला आहे.

Loading...
You might also like