आता थिएटरमध्ये नाही बघू शकणार ‘खिलाडी’ अक्षयचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ ? जाणून घ्या काय आहे प्रकरण

पोलिसनामा ऑनलाइन –लॉकडाऊनमुळं फिल्म इंडस्ट्रीचंही मोठं नुकसान झालं आहे. बॉलिवूड स्टार अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब हा सिनेमा याच वर्षी रिलीजसाठी तयार होता. आता हा लॉकडाऊनमुळं थिएटरमध्ये पाहणं शक्य होणार नाही. अशी माहिती आहे की, मेकर्सनी सिनेमाच्या रिलिजसाठी एक नवीन कल्पना शोधली आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार, अशी माहिती आहे की मेकर्स आता लक्ष्मी बॉम्ब हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज न करता डिजिटल प्लॅटफॉर्मवर शिफ्ट करण्याचा प्लॅन करत आहेत. अक्षय कुमार, डायरेक्टर राघवा लॉरेंस आणि प्रोड्युसर्स डिजनी हॉटस्टार सोबत याविषयी बातचित करत आहेत. परंतु या बाबत कोणतंही अधिकृत स्टेटमेंट समोर आलेलं नाही.

असंही समजत आहे की, सिनेमातील पोस्ट प्रॉडक्शन काम जसे की, एडिटींग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग आणि व्हिएफएक्स असं सारं बाकी आहे. सिनेमा 22 मे 2020 रोजी रिलीज होईल असं सांगितलं जात होतं परंतु हा सिनेमा जास्त वेळ लागत असल्यानं जूनपर्यंत रेडी होण्याची शक्यता आहे. यात अक्षयनंही गुंतवणूक केली आहे. दरम्यान डिजिटल प्लॅटफॉर्मच्या प्रदर्शनाबाबत मेकर्सनं अधिकृत स्टेटमेंट न दिल्यानं पोलीसनमा याची पुष्टी करत नाही.