PM नरेंद्र मोदींनी ज्या अन्‍नधान्यांचा आग्रह केला, ती तुमच्या शरिरासाठी अत्यंत महत्वाची, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयुष मंत्रालयाच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी तृणधान्याचे (भरड धान्याचे) महत्त्व सांगितले आहे. तसेच तृणधान्याची लागवड करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान केले आहे. पीएम मोदी यांच्या या वक्तव्यानंतर देशात पुन्हा एकदा तृणधान्याची चर्चा सुरू झाली आहे.
Millets
मोदी म्हणाले की , ‘आज आपण पाहतो की आपण सोडून दिलेला आहार जगाने स्वीकारलेला आहे . ज्वारी, बाजरी, नाचणी , बार्ली, कोदो, वरी, भगर, सावा, राजगिरा अशी बरीच पौष्टिक धान्ये एकेकाळी आपल्या खाण्यापिण्याचा भाग होती. मात्र आपल्या ताटातून ती गायब झाली आहेत. आता याच पौष्टिक आहाराची जगभर मागणी वाढली आहे. 50 वर्षांपूर्वी आपली खाद्यसंस्कृती पूर्णपणे भिन्न होती. आपण तृणधान्य खाणारे लोक होते. साठच्या दशकात हरित क्रांतीच्या वेळी आम्ही आमच्या ताटामध्ये गहू आणि तांदूळ आले आणि आपण स्वतःहून तृणधान्ये खाणे सोडून दिले. साडेसहा हजार वर्षे आपण जे धान्य खात होतो, त्याकडे आपण पाठ फिरविली आणि आज संपूर्ण जग त्याच तृणधान्याकडे परत येत आहे.’

तृणधान्य (भरड धान्य ) म्हणजे काय? –
साठच्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत भारतात तृणधान्यांची लागवड करण्याची परंपरा होती. असे म्हटले जाते की आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपासून तृणधान्यांचे उत्पादन केले आहे. भारतीय हिंदू परंपरेत तृणधान्यांची लागवड केली जात होती याचा पुरावा यजुर्वेदात सापडतो. 50 वर्षांपूर्वीपर्यंत मध्य आणि दक्षिण भारतासह डोंगराळ भागात बर्‍याच तृणधान्यांचे उत्पादन होत होते. साधारणपणे देशातील एकूण अन्न उत्पादनापैकी तृणधान्य 40 % होते.

तृणधान्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, बार्ली, कोडो, वरी, भगर, सावा, राजगिरा यांचा समावेश होतो. तृणधान्य यासाठी म्हटले जाते कारण त्यांच्या उत्पादनामध्ये जास्त कष्ट व मशागत करण्याची आवश्यकता नसते. हे धान्य कमी पाण्यात आणि कमी सुपीक जमिनीत देखील वाढते. धान आणि गहू पिकांच्या तुलनेत तृणधान्याच्या पिकाला पाणी कमी लागते. त्याच्या लागवडीत यूरिया व इतर रासायनिक खतांची गरज भासत नाही. म्हणूनच ते पर्यावरणासाठीही चांगले आहे.

ज्वारी, बाजरी आणि नाचणीच्या लागवडीसाठी धानापेक्षा 30 % कमी पाणी लागते. एक किलो तांदळाचे उत्पादन सुमारे 4 हजार लिटर पाणी घेते, तर तृणधान्याच्या पिकाला नाममात्र पाणी लागते. तृणधान्ये निकृष्ट मातीत देखील वाढतात. ही धान्ये फार लवकर खराब होत नाहीत. 10 ते 12 वर्षांनंतरही ती खाण्यास योग्य राहतात. मुसळधार पावसातही हे पीक तग धरून राहते. कमी-जास्त पावसाचा त्याचा परिणाम होत नाही.

राजगिरा
ज्वारी, बाजरी आणि नाचणी यांसारख्या तृणधान्यांमध्ये पोषणद्रव्ये भरपूर असतात. राजगिरा हे भारतीयांचे अत्यंत पौष्टिक जाड धान्य आहे. ते कॅल्शियमने समृद्ध आहे. नाचणीमध्ये प्रति 100 ग्रॅम कॅल्शियम 344 मिलीग्रॅम असते. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी राजगिरा फायदेशीर आहे. त्याच प्रकारे, बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. तेथे 11.6 ग्रॅम प्रथिने, 67.5 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 8 मिलीग्राम लोहाचे प्रमाण आणि बाजरीच्या 100 ग्रॅम प्रति 13 ग्रॅम कॅरोटीन असते. कॅरोटीन आपल्या डोळ्यांना संरक्षण प्रदान करते.
Jawar
ज्वारी
ज्वारी हे जगातील पाचवे महत्त्वाचे धान्य आहे. हा अर्धा अब्ज लोकांचा मुख्य आहार आहे. आज, ज्वारी मुख्यतः वाइन उद्योग, ब्रेड उत्पादनासाठी वापरली जाते. ज्वारीचा उपयोग बेबी फूड तयार करण्यासाठी देखील केला जातो. वाढत्या लोकसंख्येसाठी अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी ज्वारी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.

तृणधान्य लागवडीवर सरकारचा भर –
केंद्र सरकार तृणधान्याच्या लागवडीवर भर देत आहे कारण ही धान्ये वाढत्या लोकसंख्येला पौष्टिक आहार देऊ शकतील. तृणधान्याचे पौष्टिक गुणधर्म लक्षात घेता सरकार यास मिड-डे जेवण योजना आणि सार्वजनिक वितरण प्रणालीत समाविष्ट करण्याचा विचार करीत आहे.

केंद्र सरकारने तृणधान्य लागवडीला चालना देण्यासाठी 2018 हे तृणधान्याचे वर्ष म्हणून साजरे केले. तत्कालीन कृषिमंत्री असलेले राधा मोहन सिंग यांनी संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेला एक पत्र लिहून 2019 ला तृणधान्याचे वर्ष म्हणून साजरे करण्याचा आग्रह केला होता.

छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागात तृणधान्यांची लागवड वाढली आहे. दक्षिण भारतातही खडबडीत धान्यांचा वापर करण्याचा कल वाढला आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशामध्ये दररोजच्या आहारात तृणधान्यांचा समावेश केला जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like