सिमला मिरची खाण्याचे ‘हे’ 4 आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहितीयेत का ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ढोबळी मिरची आपल्याला माहितीच आहे. याला सिमला मिरची किंवा भोपळी मिरची असंही म्हणतात. अनेकांना माहिती नसेल परंतु याचे आपल्या शरीरासाठी अनेक गुणकारी फायदे होतात. आज याच फायद्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) वजन नियंत्रणात राहतं – जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर यासाठी सिमला मिरची फायदेशीर ठरते. यात कॅलरीज कमी असतात. त्यामुळं ही भाजी जर खाल्ली तर वजन नियंत्रणात राहतं. यामुळं शरीरातील मेद कमी होण्यासही फायदा होतो.

2) मधुमेह नियंत्रणात राहतो – या मिरचीत व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स यांचं प्रमाण खूप असतं. त्यामुळं शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठीही त्याचा फायदा होतो.

3) पचनक्रिया सुधारते – अनेकांना अपचनाचा त्रास असतो. त्यामुळं जर या मिरचीचं सेवन केलं तर पचनक्रिया सुरळीत राहते. तसंच पोटाचे विकारही बरे होतात.

4) रोगप्रतिकारक शक्ती वाढते – कोणत्याही आजाराचा सामना करण्यासाठी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती असणं गरजेचं आहे. या भाजीच्या सेवनानं शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळं वारंवार होणारे लहान-मोठे आजार यामुळं दूर होतात.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.