Captain Abhilasha Barak | कौतुकास्पद ! अभिलाषा बराक बनल्या भारताच्या पहिल्या हेलिकॉप्टर वैमानिक

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Captain Abhilasha Barak | भारतीय लष्करात अद्यापपर्यंत कोणतीही महिला लढाऊ हेलिकॉप्टरची वैमानिक बनली नाही. मात्र आता ही संधी हरयाणातील रोहतकच्या रहिवासी असलेल्या कॅप्टन अभिलाषा बराक (Captain Abhilasha Barak) यांना मिळाली आहे. नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (Combat Army Aviation Training School) (कॅट्स) 37 व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा नुकताच पार पडला. त्यामध्ये बराक यांना ‘एव्हिएशन विंग’ प्रदान करून गौरविण्यात आले.

चेन्नईतील अकादमीत 2018 मध्ये प्रशिक्षण पूर्ण करत असताना कॅप्टन अभिलाषा  यांची आर्मी एव्हिएशन कोरची निवड झाली. त्यानंतर त्या नाशिकच्या ‘कॅट्स’मध्ये दाखल झाल्या. 18 आठवड्यांचे हेलिकॉप्टर उड्डाणाचे खडतर व आव्हानात्मक असे प्रशिक्षण अभिलाषा यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले.

गुंजन सक्सेनाप्रमाणे ‘चित्ता’चे उड्डाण –

लष्करात यापूर्वी महिलांना लढाऊ वैमानिक होण्याची संधी मिळत नव्हती. त्यानंतर पहिल्यांदाच ती संधी उपलब्ध करून देण्यात आली. 1994 मध्ये हवाई दलात भरती झालेल्या गुंजन सक्सेना (Gunjan Saxena) या हेलिकॉप्टर वैमानिकाने कारगिल युद्धात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. त्यानंतर आता संधी कॅप्टन अभिलाषा यांना मिळणार आहे.

Web Title : Captain Abhilasha Barak | Captain abhilasha barak the first helicopter pilot of india

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त