Captain Amarinder Singh | पंजाबच्या राजकारणात नवा वाद ! तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या पाकिस्तानी गर्लफ्रेंडची ‘खमंग’ चर्चा

चंदीगड : वृत्तसंस्था –  Captain Amarinder Singh | मागील काही दिवसात कॅप्टन अमरिंदर सिंह (Captain Amarinder Singh) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यामुळे पंजाबच्या राजकारणात (Punjab politics) मोठी खळबळ उडाली. अनेक घडामोडी झाल्यानंतर आता अमरिंदर सिंह यांनी नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा करत त्यांनी भाजपची (BJP) युती करण्याचे संकेत दिले. यानंतर पंजाबच्या राजकारणात मोठ्या चर्चेला उत आला. त्यानंतर काँग्रेससहीत (Congress) आम आदमी पक्षाचीही (Aam Aadmi Party) गडबड उडाली आहे. तर, पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची पाकिस्तानी गर्लफ्रेंड आरुसा आलम हिचे आयएसआयशी संबंध’ असल्याचा दावा विरोधकांकडून केला जातो आहे. यामुळे आता एक नवा वाद निर्माण झाला आहे.

 

‘अमरिंदर सिंह (Captain Amarinder Singh) यांच्या निवासस्थानी उतरलेल्या कथितरित्या आयएसआय एजंटबाबत काँग्रेस नेत्यांचं आणि मंत्र्यांचं आता काय म्हणणं आहे?
त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी याचा पत्ता नव्हता की ती महिला आयएसआय एजंट आहे?’ असं म्हणत हरपाल सिंह चीमा (Harpal Singh Cheema) यांनी काँग्रेससोबत अमरिंदर सिंह यांनाही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच चीमा म्हणाले की, अत्यंत शांतीपूर्ण पद्धतीनं आपला विरोध नोंदविणाऱ्या शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटलं जातं.
आणि ज्या अमरिंदर सिंहांच्या घरी पाकिस्तानी एजन्सी आयएसआयची एजंट पाहुणी म्हणून दाखल होते.
ते मात्र ‘देशभक्त’ आहेत’ असं म्हणत चीमा यांनी भाजपवर आरोप केला आहे.
तत्पुर्वी भाजपने अमरिंदर सिंह हे देशभक्त असल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान, पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा (Sukhjinder Singh Randhawa) यांनीही ‘अमरिंदर सिंह यांची पाकिस्तानी मैत्रीण आणि तिच्या पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेशी संबंधांची चौकशी करण्यात येईल’, असा दावा केला आहे.
अमरिंदर सिंह यांना वारंवार समज दिल्यानंतरही त्यांची पाकिस्तानी महिला मित्र तब्बल साडे चार वर्ष त्यांच्या सरकारी निवासस्थानी राहिली, असंही ते म्हणाले.
त्याचबरोबर ईडीकडून चौकशी झाल्यानंतर आणि पाकिस्तानी नागरिकाला शरण दिल्यानंतर अमरिंदर सिंह यांनी भाजपशी हातमिळवणी केला.
असं रंधावा म्हणाले. या दरम्यान, अमरिंदर सिंह यांनी नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा केल्यानंतर काँग्रेसनं (Congress) अमरिंदर यांना ‘संधिसाधू’ ठरवण्यात आलं आहे.

 

Web Title : Captain Amarinder Singh | ruckus on captain amrinder singh pak lady friend deputy cm sukhjinder singh randhawa ordered isi connection probe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | जीवाची पर्वा न करता ‘कोरोना’ विरूध्दच्या मोहिमेत योगदान देणाऱ्यांचा धनकवडीत ‘सन्मान’

Breast Cancer Symptoms | महिलांसाठी अलर्ट ! भारतात ‘ब्रेस्ट कॅन्सर’ची प्रकरणे 50% वाढली, ‘या’ 7 लक्षणांवरून ओळखा; वेळेवर योग्य उपचारासाठी होईल मदत

Latur District Bank Election | भाजपला धक्का ! लातूर जिल्हा बँक निवडणुकीत सर्व उमेदवारांचे अर्ज बाद