भारतीय सैनिकाची कमाल, अद्भुतरित्या बनवले वर्ल्ड ‘रेकॉर्ड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जबलपूरमधील सिग्नल ट्रेनिंग सेंटरमध्ये भारतीय लष्कराच्या डेअर डेव्हिल्स संघाने एक नवीन जागतिक विक्रम नोंदविला आहे. कॅप्टन दिशांत कटारिया यांनी 65 लोकांच्या वरून बाइकवरून उडी मारून जुना विक्रम मोडला आहे. कॅप्टनने दुचाकीवरून 60.4 फूट उडी घेतली आहे. यापूर्वी 2013 मध्ये, डेअर डेव्हिल्सच्या संघाने 44.10 फूट उडीची नोंद केली होती.

सिग्नल ट्रेनिंग सेंटरमध्ये सर्वांत लांब रॅम्प जंप ही अप्रतिम कामगिरी होती. येथे मंगळवारी डेअर डेव्हिल्स संघाचे कॅप्टन दिशांत कटारिया यांनी 65 हून अधिक लोकांच्या वरून दुचाकी उडवली, तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले. या जंपमध्ये त्यांची दुचाकी हवेत 60.4 फुटांपर्यंत होती.

ही झेप पूर्ण झाल्यावर कॅप्टन दिशांत कटारियाच्या नावे एक नवीन जागतिक विक्रम नोंदविण्यात आला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसह लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ही झेप नोंदवली गेली आहे.

2013 मध्ये डेअर डेव्हिल्सचा कर्णधार असलेले मेजर अभयजीत मेहलावतने 44.10 फूट लांब 51 जणांच्या वरून रॅम्प उडी मारली. हे सांगण्यात आले आहे की, डेअर डेव्हिल्सच्या संघाने बनवलेला आतापर्यंतचा 28 वा विश्वविक्रम आहे.