‘कॅप्टन’ विराट कोहली दहशतवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’वर !

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाइन – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा दहशतवाद्यांच्या हिट लिस्टमध्ये असल्याचा गोपनीय अहवाल पुढे आला आहे. ऑल इंडिया लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेच्या हिट लिस्ट वर कर्णधार विराट कोहली असल्याचे सुत्रांनी सांगितले.

दहशतवादी संघटनांच्या हिट लिस्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा यांची नावे असल्याचे गुप्तचर संस्थांचे म्हणणे आहे. त्यांच्या हिट लिस्टवर नेहमीच राजकारणी व मंत्री असतात. पण, प्रथमच क्रिकेटपटू त्यांच्या हिट लिस्टवर आला असल्याचे सांगण्यात येत आहे.

कर्णधार विराट कोहली हा देशातील सर्वात लोकप्रिय खेळाडु असून त्यांचे लाखो फॅन्स आहेत. नोव्हेबरमध्ये दिल्लीत २० -२० सामना होणार आहे. गुप्तचर संस्थांच्या इशाऱ्यांनंतर दिल्ली सामन्यांच्या वेळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Visit : Policenama.com