पुणे होर्डिंग दुर्घटना प्रकरण  : कॅप्शन जाहिरात कंपनीच्या मालकाला बेड्या

पुणे  :  पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील जुना बाजार चौकात होर्डींग कोसळून झालेल्या भीषण अपघातात ४ जणांना जीव गमवावा लागला होता. याप्रकरणी कॅप्शन जाहिरात कंपनीच्या मालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आत्तापर्यंत या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या तीन झाली आहे. अब्दुल रझाक मोहम्मद खालीद फकी असे अटक करण्यात आलेल्य कॅप्शन जाहिरात कंपनीच्या मालकाचे नाव आहे. याआधी रेल्वे कर्मचारी पांडुरंग वनारे आणि संजय सिंग या दोघांना अटक करण्यात आली होती. संजय सिंह हा रेल्वेमध्ये सेक्शन इंजिनिअर आहे तर वनारे हे लोहार म्हणून कार करतात. हे दोघे होर्डींग काढण्याचे काम करत होते. होर्डीग वरुन कापण्याऐवजी खालून कापण्यात आल्याने ही दुर्घटना घडली होती. या घटनेनंतर कंपनीने दुर्घटनेसाठी मध्ये रेल्वेला जबाबदार धरत हात वर केले होते.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f916a46a-cd48-11e8-895b-413ceb6a55aa’]

५ ऑक्टोबरला दुपारी जुना बाजार येथील मुख्य चौकात होर्डिंगचा लोखंडी सांगाडा कोसळून झालेल्या भीषण अपघातात चार जणांना जीव गमवावा लागला तर सात जण गंभीर जखमी झाले. मध्ये रेल्वेच्या जागेत रस्त्यालगत हे होर्डिंग उभारण्यात आले होते.

[amazon_link asins=’B01FM7GGFI,B01DDP7D6W,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’080d34b9-cd49-11e8-9d02-6b3f7aca406b’]

मध्ये रेल्वे प्रशासनाने यासाठी कॅप्शन या जाहिरात एजन्सीला दोषी ठरवले होते. कॅप्शन अॅडव्हर्टायझिंग कंपनीकडे या होर्डिंगचा ठेका होता. त्यांनी मात्र या दुर्घटनेसाठी मध्ये रेल्वेच दोषी असल्याचा दावा केला होता. यासाठी त्यांनी यापूर्वी मध्य रेल्वेशी हे होर्डिंग काढण्यासाठी केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती पुरावा म्हणून सादर केले होते. शुक्रवारी पुण्यातील जुना बाजार मुख्य चौकातील होर्डिंगचा लोखंडी सांगाडा काढताना तो सिग्नलसाठी उभ्या असलेल्या लोकांच्या अंगावर पडला होता. यात चार जणांना नाहक जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेनंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते.

कार चोरणारा पुणे पोलिसांकडून गजाआड

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर गंभीर जखमींना प्रत्येकी १ लाख रुपये तर किरकोळ जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही दिले आहेत.