भीमा कोरेगांवच्या दंगलीमध्ये राहुल फटांगडेचा खून करणारे कॅमेर्‍यात कैद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

भीमा कोरेगांव येथे विजय स्तभास मानवंदना देणे व शौर्य दिवसा साजरा करण्याच्या कार्यक्रमा दरम्यान उफाळलेल्या दंग्यामध्ये राहुल बाबाजी फटांगडे (30, रा. साईनाथनगर, डोंगरवस्ती, सणसवाडी, ता. शिरूर) याचा खून करणार्‍यांचा व्हिडीओ आणि फोटो राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) मिळाले असून आरेापींबाबत काही माहिती मिळाल्यास नागरिकांनी सीआयडीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नववर्षाच्या सुरवातीलाच म्हणजेच दि. 1 जानेवारी 2018 रोजी भिमा कोरेगांव येथे विजय स्तभांस मानवंदना देणे व शौर्य दिवस साजरा करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमा दरम्यान दंगड उफाळुन आली होती. उफाळलेल्या दंग्यामध्ये जमावातील काही लोकांनी बेदम मारहाण केल्याने राहुल बाबाजी फटांगडे (30, रा. साईनाथनगर, डोंगरवस्ती, सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) यांचा मृत्यू झाला. त्यानंतर बरेच दिवस राज्यभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. राहुल फटांगडेंच्या मृत्युप्रकरणी शिक्रापुर पोलिस ठाण्यात आरोपींविरूध्द भादंवि 302, 143,147,148,149, सह मुंबई पो.अधि. 1951 चे कलम 37(1) 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) चालु आहे. आत्‍तापर्यंत फटांगडे खूनप्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे.

सीआयडीकडे भिमा कोरेगांव येथे उफाळलेल्या दंग्याची व्हिडीओ क्लीप उपलब्ध झाली आहे. राहुल फटांगडे यांना मारहाण करणार्‍याचे फोटो त्या क्लिपवरून काढण्यात आले आहेत. सदरील क्लिप व फोटो मधील व्यक्‍तींबद्दल कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी सीआयडीशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस अधिक्षक पी.पी. अक्‍कानवरू यांनी केली आहे. संपर्कासाठी कार्यालयाचा पत्‍ता आणि मोबाईल क्रमांक पुढील प्रमाणे ः- पोलिस अधिक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे पथक मध्यवर्ती इमारत, साधु वासवानी रोड, पीडीसीसी बँकेजवळ, पुणे. मोबईल क्रमांक ः- 9049650789

(संशयित आरोपी)

(संशयित आरोपी)

(संशयित आरोपी)

(संशयित आरोपी)

फटांगडे यांच्या खून प्रकरणी तीनजणांना अटक

भीमा-कोरेगांव हिंसाचार प्रकरणात पेरणे फाटा येथील पेट्रोल पंपापासून काही अंतरावर जमावाने दुचाकीस्वार राहुल फटांगडे यांना बेदम मारहाण केली होती. त्यांच्या डोक्यात दगड मारल्याने त्याचा मृत्यू झाला होता. फटांगडे हे मूळचे शिरुर तालुक्यातील कान्हूर मसाई गावातील रहिवासी होते.

फटांगडे यांच्या खून प्रकरणी तीनजणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी दोघेजण अहमदनगर येथील रहिवाशी आहेत. तर  एकजण औरंगबादचा रहिवासी आहे .त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. फटांगडे यांच्या खून प्रकरणात आणखी चार संशयित सामील आहेत.