भरधाव BMW नं 3 जणांना फरफटत नेले, अंगावर शहारे आणणारी घटना

पोलिसनामा ऑनलाईन टीम – दिल्लीमध्ये दोन दिवसांपुर्वी रात्री उशिरा एक मोठा अपघात झाला असून फॅशन डिझायनर असलेल्या तरुणीने बीएमडब्ल्यू कारने आयस्क्रीम वेंडरसह दोन जणांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भरधाव कारने तीन जणांना फरफट नेल्याची आणि चिरडल्याची घटना कॅमेर्‍यात कैद झाली आहे. दिल्लीतील अमर कॉलोनी इथे घडली आहे.

आयस्क्रीम खात असलेल्या दोन जणांसह वेंडरलाही भरधाव कारने चिरडल्याचा धक्कादायक प्रकार घडला. कार चालवणारी तरुणी फॅशन डिझायनर असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तरुणीला अटक केली आहे. ही तरुणी आयस्क्रीम घेऊन कारमध्ये बसली.

आयस्क्रीम खात असताना अचानक एक्सलेटर दाबला आणि तीन लोकांना जोरात धडक दिली. घटनेनंतर तरुणीने पळ काढला. पण तिथे असलेल्या पोलिसांनी या तरुणीला अडवून ताब्यात घेतले. या प्रकऱणी तरुणीला अटक केली असून पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.