२ कार आणि बाईकचा विचित्र अपघात, महिलेसह ६ ठार, ३ गंभीर

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन कार आणि एका दुचाकीच्या विचित्र अपघातात सहा जण ठार झाले तर तीन गंभीर जखमी झाले आहे. हा भीषण अपघात आंबोली येथे झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राकेश शाह, प्रतिभा शाह, बी. डी. जाधव (पनवेल), नवनाथ नवले (मोखाडा), आकाश चव्हाण, दिलीप चंदने असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. जखमी झालेल्या व्यक्तींची नावे अद्याप समजू शकली नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडून गुजरातच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कारची धडक दुसऱ्या कारला झाली. भरधाव वेगात असणाऱ्या कार समोर दुचाकी आल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात तिन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. अपघातग्रस्त वाहनांपैकी एक वाहन मुंबईतील बोरिवली येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.