मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर कार उलटून महिला ठार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर भरधाव जाणारी कार रस्त्याच्या कडेला लावलेल्या लोखंडी पत्र्याला धडकून ती उलटल्याने झालेल्या अपघातात कारमधील एका महिलेचा मृत्यु झाला. हा अपघात लोणावळा ते मळवळी दरम्यान असलेल्या औंढे पुलाजवळ बुधवारी सकाळी ८ वाजता घडला.

मुंबईहून ही कार पुण्याच्या दिशेने येत होती. वेगात गाडीवर नियंत्रण न राहिल्याने रस्त्याकडेला लावलेल्या लोखंडी पत्र्याला धडकली. त्यानंतर कार उलटली. या अपघाताची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस, महामार्ग पोलीस व रस्ते विकास महामंडळाचे सुरक्षा पथक घटनास्थळी गेले. प्रवाशांच्या मदतीने गाडीत अडकलेल्या जखमी व्यक्तीला बाहेर काढून रुग्णालयात रवाना केले. मात्र, गाडीतील एका महिलेचा मृत्यु झाला. जखमी व महिला हे दोघेही मुंबईतील राहणारे आहेत.

Visit : Policenama.com