मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर कारचा अपघात, 6 महाविद्यालयीन तरुण-तरुणी जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर भरधाव जाणारी कार रस्त्याच्या दुभाजकाजवळ लावलेल्या लोखंडी ग्रीलला धडकून अपघात झाला आहे. या अपघातात पुण्यातील २ तरुणी व ४ महाविद्यालयीन तरुण हे जखमी झाले आहेत. चालक हर्ष वर्धनता (वय 20, रा. रांची झारखंड), पार्थ गोगिया (वय 20, रा. नोयडा), नितिन सिंग चौधरी (वय 19, रा. नोयडा), अनिशा जैन (वय 19, रा. जयपुर), ब्रिजल पालेजा (वय 19 रा. जम्मू), आदित्य सिंग (वय 19, रा. जम्मू), हे जखमी झाले आहेत.

हा अपघात ओझर्डे गावाजवळील फुटमॉलजवळ शनिवारी सकाळी सात वाजता घडला. पुण्यातील एका महाविद्यालयातील २ तरुणी व ४ तरुण लोणावळ्याला फिरायला निघाले होते. वेगाने जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी रस्त्याच्या कडेला लावलेल्या संरक्षक लोखंडी ग्रीलला जाऊन धडकली. त्यात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

अपघाताचे वृत्त समजताच हायवे पोलीस, डेल्टा फोर्सचे कर्मचारी घटनास्थळी धावून आले. त्यांनी गाडीतील तरुण तरुणींना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून तलेगाव येथील ट्रामा केअरमध्ये दाखल केले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/