महामार्गावरून चारचाकी गाडी गेली थेट विहिरीमध्ये, पुढं झालं असं काही (व्हिडीओ)

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – पुणे-सोलापूर महामार्गावर असणाऱ्या दौंड तालुक्यातील यवतजवळ डस्टर कार हे वाहन महामार्ग ओलांडून थेट शेजारील विहिरीमध्ये पडल्याने एकच खळबळ माजली आहे. हि कार विहिरीमध्ये पडत असताना वेळीच प्रसंगावधान राखत चालकाने उडी मारल्याने तो बालंबाल बचावला आहे. हि घटना समजताच यवत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहन विहिरीतून बाहेर काढले आहे तर जखमी झालेला वाहन चालक भाऊसाहेब मुरलीधर जगताप यास खाजगी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे.

You might also like