पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; पुण्याचे दोघे जागीच ठार, 3 जखमी

मलकपूर : पोलिसनामा ऑनलाईन – पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर जखीणवाडी (ता. काराड) गावच्या हद्दीत कारला अज्ञात वाहनाने धडक देवून झालेल्या अपघातात पुण्यातील दोनजण जागीच ठार झाले, तर अन्य तीनजण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडली असून अपघाताची नोंद कराड शहर पोलिसात झाली आहे.

श्रीहरी तुकाराम वाघमारे (वय ४८, रा. भेकराईनगर, हडपसर, पुणे), बापूसाहेब खंडेराव कांबळे (वय ५०, रा. काळेवाडी, पिंपरी, पुणे) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर अश्‍विनी श्रीहरी वाघमारे (वय ४५), रागिनी श्रीहरी वाघमारे (वय २१, रा. रा. भेकराईनगर, हडपसर, पुणे), चालक फुलचंद नवनाथ चतुर (वय ३९, रा. गंगानगर फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे) अशी जखमींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी,फुलचंद चतुर हे बुधवारी आपले नातेवाईक श्रीहरी वाघमारे, बापूसाहेब कांबळे, अश्‍विनी वाघमारे, रागिनी वाघमारे यांच्या समवेत मारूती सुझुकी कारने (क्रमांक एम. एच. १२ एसक्यू ११९५) पुणेहून बेळगावला औषध आणणेसाठी निघाले होते. त्यांची कार जखीणवाडी गावच्या हद्दीत मळाईदेवी पतसंस्था समोरील चौकात आली असता समोरून डाव्या बाजूने आलेल्या अज्ञात वाहनाने कारला जोराची धडक दिली. यामध्ये श्रीहरी वाघमारे व बापूसाहेब कांबळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारसाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे सांगितले. तर अश्‍विनी वाघमारे, रागिनी वाघमारे व फुलचंद चतुर हे किरकोळ जखमी झाले. अपघात होताच घटनास्थळावरून अज्ञात वाहधारकाने वाहनासहित पोबारा केला. याबाबत कारचालक फुलचंद चतुर यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञात वाहनधारकावर गुन्हा नोंद केला आहे.