Car accident । जळगाव-भुसावळ महामार्गावर भरधाव कारला अपघात, मुंबईचे 2 तरुण ठार

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जळगाव-भुसावळ (Jalgaon Bhusawal) हायवेवर कारचा अपघात (Car Accident) होऊन मुंबई येथील तरुणाचा आणि त्याच्या मित्राचा मृत्यू झाला आहे. महामार्गावरील तरसोद फाट्याजवळ कार घसरुन कलटी झाल्यामुळे हा अपघात (Accident) घडला आहे. ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. अभिजित सुभाष पसारे (वय, 30 रा. डोंबिवली) आणि पवन नंदू बागुल (वय, 27, रा. मानपाडा) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. भावी पत्नीसह सासूला साकेगाव (Sakegaon) येथे सोडून परतीचा प्रवास करताना हा घात झाला आहे. (Car accident on Jalgaon-Bhusawal highway)

याबाबत अधिक माहिती अशी की, अभिजित (Abhijit) आणि पवन (pawan) दोघे मुंबईत खासगी कंपनीत कामाला आहेत. अभिजित याचा काही महिन्यांपूर्वी भुसावळ येथील साकेगाव येथील एका मुलीशी साखरपुडा झाला. त्याचे भावी सासरे आजारी असल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईत आणले होते. त्यानिमित्ताने अभिजितची भावी पत्नी आणि सासु दोघे मुंबईत आले होते. रुग्णालयाचे काम झाल्यावर 7 जुलै रोजी अभिजीत कार घेऊन सासु व भावी पत्नी यांना सोडण्यासाठी साकेगाव येथे आला होता. त्याचा मित्र पवन याची पत्नी मालेगाव येथे माहेरी आली होती. पत्नीस मुंबईत परत घेऊन जायचे असल्याने अभिजीतसोबत साकेगावात पवनही आला. भावी पत्नी व सासु यांना सोडल्यानंतर रात्री उशिरा पवन व अभिजीत साकेगावातून कारने मुंबईकडे निघाले होते.

दरम्यान, येत असताना आज (गुरुवारी) पहाटे 3 वाजता तरसोद फाट्याजवळ आल्यानंतर तेथे चौपदरी रस्ता संपल्यानतंर कारचा वेग अधिक असल्याने त्यांना पुढच्या रस्त्याचा अंदाज आला नाही.
त्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि भरधाव कार उजव्या बाजुला वळवताच 6-7 वेळा कलटी झाली.
कार कलंडत असताना अभिजीत गाडीतून बाहेर फेकला गेल्याने डोक्यास मार लागुन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर पवन गंभीर जखमी झाला.
अपघाताची (Accident) माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अभिजीतचा मृतदेह शासकीय रुग्णालयात आणला तर जखमी पवन याला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल केले होते.
उपचार सुरू असताना काही वेळातच त्याचाही मृत्यू (Death) झाला आहे.
या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात (Nasirabad Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

Web Titel :- Car Accident | two mumbai youths lost their lives in a tragic car accident on the highway in jalgaon

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Fire at CBI office । दिल्लीतील CBI मुख्यालयाला आग; अधिकारी बाहेर पळाले, 5 अग्निशमन गाड्या दाखल

Sanjay Raut | नारायण राणेंची उंची दिलेल्या जबाबदारीपेक्षा मोठी; राणेंना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

Gold Price Today | खुशखबर ! सोन्याच्या किंमतीत आज मोठी घसरण, ₹ 8,750 स्वस्त झाले सोने, जाणून घ्या दर

प्रकृती बिघडल्याने खडसेंची पत्रकार परिषद रद्द ! ईडीच्या चौकशीला हजर राहणार काय याकडे लक्ष