धक्‍कादायक ! कर्तव्य बजावणाऱ्या ‘गर्भवती’ महिला पोलीस कॉन्स्टेबलला कारने उडवले

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – दुचाकीवरुन ट्रीपल सीट जाणाऱ्या दुचाकीस्वारावर कारवाई करत असताना एका भरधाव वेगात जाणाऱ्या कारने गर्भवती महिला पोलीस कॉन्स्टेबलला उडवल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (सोमवार) दुपारच्या सुमारास कोल्हापुरातील सीपीआर चौकात घडली. या घटनेत महिला कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विद्या निवृत्ती वाळके (वय-२८ रा. पोलीस लाईन, कसबा बावडा) असे गंभीर जखमी झालेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. याप्रकरणी कार चालक संजय शंकर पाटील (रा. केखले, ता. पन्हाळा) याला लक्ष्मीपुरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आज दुपारी महिला कॉन्स्टेबल सीपीआर चौकामध्ये कर्तव्य बजावत होत्या. त्यावेळी ट्रीपल सीट जाणाऱ्या दुचाकीस्वारावर कारवाई करत होत्या. त्यावेळी पन्हाळ्याकडून कसबा बावडा मार्गे जात असलेल्या भरधाव कारने विद्या वाळके यांना धडक दिली. या धडकेत विद्या वाळके यांच्या पोटाला गंभीर मार लागल्याने त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेतील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, विद्या वाळके यांना धडक देणाऱ्या कार चालकाला पोलिसांनी अटक केली.

आरोग्यविषयक वृत्त