भारतातील सर्वात स्वस्त 5 सनरूफ कार, तुमच्या बजेटमध्ये सहज होतील फिट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल कारमध्ये सनरुफ एक अत्यंत प्रीमियम फिचर मानले जाते. सनरूफला काही काळापूर्वी फक्त लक्झरी कारमध्येच ऑफर केले जायचे, परंतु आता तसे नाही, आपण कमी बजेटच्या कारमध्येही सनरूफचा लाभ घेऊ शकता. जाणून घेऊ अशा स्वस्त कारंबद्दल, ज्यात कंपनी फिटेड सनरुफ देते..

1. टाटा नेक्सन
टाटा नेक्सन ही अतिशय लोकप्रिय कार आहे. ही कार उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. सनरुफ वैशिष्ट्यासह भारतात आढळणारी ही सर्वात स्वस्त कार आहे. टाटा नेक्सनच्या सनरुफ ट्रिमबद्दल बोलताना त्याची किंमत 8.36 लाख रुपयांपासून सुरू होते. सन रूफ मॉडेलबद्दल बोलायचे तर यात 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आणि मॅन्युअल ट्रांसमिशन आहे.

2. Honda Jazz
आपणास होंडा जॅझमध्ये देखील सनरूफ मिळतो. या कारच्या टॉप स्पेक ZX आणि ZX CVT मध्ये सनरूफ देण्यात आला आहे. या व्हेरिएंटची किंमत 8.73 लाख रुपये पासून सुरू होते.

3. Honda WRV
होंडा सिटी प्लॅटफॉर्मवर तयार केलेली, होंडा डब्ल्यूआरव्ही प्रीमियम एसयूव्ही आहे. ही क्रॉस ओव्हर आहे. या कारमध्ये उत्कृष्ट वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. ते पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह उपलब्ध आहेत. या कारच्या सनरूफ मॉडेलची किंमत 9.69 लाख रुपये पासून सुरू होते.

4. Hyundai Venue
ह्युंदाईची आणखी एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही म्हणजे सनरूफ वैशिष्ट्य असलेली व्हेन्यू जिला भारतीय ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ह्युंदाई व्हेन्यू सनरूफ ट्रिमची किंमत 9.84 लाख रुपये पासून सुरू होते. स्मार्ट इलेक्ट्रिक सनरुफशिवाय हुंडई व्हेन्यूमध्ये बरीच प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. कारमध्ये 1.2L कप्पा पेट्रोल, 1.0L टर्बो-जीडीआय पेट्रोल आणि 1.5L U2 CRDi डिझेलचा समावेश आहे. सनरुफ प्रकारात 1.0L टर्बो-जीडीआय किंवा 1.5L U2 CRDi इंजिन आहे.

5. Kia Sonet
पॉवर आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर, किआ सॉनेटमध्ये रिफाइंड 1.5 CRDi डीजेल इंजन देण्यात आले आहे. जे 6 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन सोबत (100 पीएस पॉवर जनरेट) आणि दुसरे (115 पीएस पॉवर जनरेट) 6 स्पीड ॲडव्हान्स एटी बरोबर आहे. दुसरे जी 1.0 टी-जीडीआय पेट्रोल इंजिन दिले गेले आहे जे 120 पीएसची उर्जा उत्पन्न करते. हे इंजिन 6iMT आणि 7DCT स्मार्टश्रीम सह आहे. तिसरा एंडवॉस 5-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशनसह 83PS ची जनरेटिंग पॉवर जनरेेेट करतो. सॉनेटची सनरूफ मॉडेल 9.9 लाख पासून सुरू होत.