श्रीराम संस्थानचे महाराज तुकाराम रुपनर यांच्या कारला टॅंकरची धडक, बचावलेल्या महाराजांचा ह्रदयविकाराने मृत्यू

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – भरधाव वेगातील तेलाच्या टॅंकरने तिंतरवणीच्या श्रीराम संस्थानचे तुकाराम महाराज रुपनर यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर कारने पेट घेतला. अपघातानंतर स्थानिकांनी मदत केली. त्यामुळे महाराजांसह त्यांच्या ७ वर्षीय मुलाचे प्राण वाचले. मात्र यात त्यांची कार जळून खाक झाली. हा मुंबई बीड रस्त्यावर पाडळशिंगी जवळ झाला. त्यानंतर सायंकाळी तुकाराम महाराज रुपनर यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील तिंतरवणी येथील श्रीराम संस्थानचे तुकाराम महाराज बाजीराव रुपनर हे त्यांच्या कारने बीडकडून तिंतरवणी येथे जात होते. त्यावेळी पाडळशिंगी येथील उड्डाण पुलाजवळ आल्यावर त्यांच्या मारूती क्रेटा कारला तेलाने भरलेल्या एका टॅंकरने जोरदार धडक दिली. त्यानंतर काही सेकंदातच त्यांच्या कारने पेट घेतला.त्यावेळी कारचालक परमेश्वर जाधव याला लोकांनी कारमधून बाजूला काढले. तर महारा आणि त्यांच्या ७ वर्षीय मुलालाही कारमधून बाहेर काढले. काही मिनिटातच कारने मोठ्या प्रमाणावर पेट घेतला. तर जखमी झालेल्या महाराजांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिले. त्यानंतर अघ्निशमन दलाच्या जणांनी कारला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविले. परंतु स्थानिक लोकांच्या मदतीमुळे दोघेही बालंबाल बचावले. परंतु  तुकाराम महाराज रुपनर यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.