कार आणि रेल्वेचा भीषण अपघात, रेल्वेला धडकूनही संपूर्ण कुटुंब आश्चर्यकारकरित्या बचावले

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील खामगाव येथील रेल्वे फाटकाजवळ आज दुपारी एक कार आणि मालगाडीचा अपघात झाला असून यामध्ये गाडीमधील तीन महिला आणि एक छोटे बाळ आश्चर्यकारकरित्या बचावले आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल असाच काहीसा प्रकार येथे घडला आहे.

दौंड तालुक्यातील खामगाव येथे रेल्वे फाटकावर हा थरारक प्रसंग घडला असून रेल्वे येत असल्यामुळे रेल्वे फाटक बंद होते. यावेळी फाटकाजवळ ही कार येऊन थांबली होती. गाडी चालक हे गाडी येण्यास वेळ असल्यामुळे काही कारणास्तव गाडीची चावी गाडीला ठेऊन खाली उतरले. तेवढ्यात समोरच्या सीटवर बसलेल्या लहान मुलाकडून गाडीचे स्विच चालू झाल्याने गाडी सुरू होऊन ती थेट रेल्वे फाटका खालून पुढे जाणाऱ्या मालगाडीला जाऊन धडकली. जोपर्यंत मालगाडी संपत नव्हती तोपर्यंत गाडी ही मालगाडीला घासत होती.

हृदयाचा थरकाप उडवणारे दृश्य पाहून आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला होता गाडी रेल्वेला धडकून पुढील बाजूने पूर्णपणे चक्काचूर होऊनही सुदैवाने या गाडीमधील लहान बाळ आणि ३ महिला बालंबाल बचावल्या आहेत. या प्रकरणाचा पुुुढील तपास लोणी काळभोर रेल्वे पोलीस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सावधान ! तांब्याच्या भांड्यात ठेवलेले ‘हे’ पदार्थ बनतात विषारी

माश्या, चिलटांना घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘ही’ फळे दुधासोबत खाणे आरोग्याला नुकसानकारक

चुकीच्या वेळी ‘नारळ पाणी’ पिणे आरोग्यास ‘घातक’ ; जाणून घ्या

 

Loading...
You might also like