home page top 1

आश्चर्यम…! ‘या’ विचित्र अपघातात सायकलला धडकून चेपली कार 

बिजींग : वृत्तसंस्था – अनेक वेळा असे भीषण अपघात घडलेले आपण पाहतो ज्यामुळे आपल्याला दुःख होते, पण काही असेही अपघातही घडतात ज्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटते असाच काही विचित्र अपघात घडला आहे. चीनमध्ये जे जाणून घेऊन तुम्हालाही आश्चर्य वाटेल या अनोख्या अपघाताचा फोटो सध्या चायनाच्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या अपघातात चीनमध्ये सायकल कारला धडकली अन् कार चेपली. ज्यावेळी सायकल कारला धडकली त्यावेळी कोणालाही वाटले नव्हते की, कार खराब होईल. अनपेक्षित झालेल्या अपघाताचा फोटो सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. या अपघातात सायकल आणि कारची समोरासमोर धडक झाली. त्यावेळी सायकलचे कोणत्याही प्रकारे नुकसान झाले नाही. पण कारचा पुढील भाग पुर्णपणे चेपला असल्याचे दिसून आले. या अनोख्या आणि हास्यास्पद अपघाताचे विनोद सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नोकिया कंपनीने सायकल बनवली आहे का ? असा प्रश्न अपघात पाहून विचारला जात आहे.

शांघाईच्या एका वेबसाईटने हा अपघात खोटा असल्याचे म्हटले आहे. पण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायकल आणि कारचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सायकलचालक जखमी झाला आहे.
Loading...
You might also like