ड्रेनेज लाईनच्या खड्ड्यात कार कोसळून चालकाचा मृत्यू

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात मारुती कार कोसळून झालेल्या अपघातात वाहनचालकाचा मृत्यु झाला. ही घटना मुल्ला बाग बस डेपोजवळ बुधवारी सकाळी सव्वा सहा वाजता घडली.

सचिन काकोडकर (वय ३७, रा. चित्रा बिल्डिंग, आकाशगंगा कॉम्लेक्स, घोडबंदर रोड, ठाणे प़) असे मृत्यु पावलेल्यांचे नाव आहे.
इगल कंस्ट्रक्शनकडून नीलकंठ ग्रीन्सकडून घोडबंदर रोड दरम्यान मुल्ला बाग बस डेपोजवळ नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी रस्त्याच्या कडेला खड्डा खोदण्यात आला आहे.

सचिन काकोडकर हे घोडबंदर रोडकडे जात असताना रस्त्याच्या कडेला लावलेल्या तात्पुरत्या पट्ट्या तोडून त्यांची गाडी खड्यात पडली व ते गाडीत अडकून पडले. खड्डा इतका लहान होता की, त्यामुळे गाडीचे दरवाजा उघडून त्यांना बाहेर काढता येत नव्हते. शेवटी जेसीबी मागवून कार उचलून बाहेर काढण्यात आली. कारमध्ये अडकलेल्या काकोडकर यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तोपर्यंत त्यांचा मृत्यु झाला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like