हाॅर्न वाजवला म्हणून कारचालकाला दगडाने मारहाण

पिंपरी: पोलीसनामा आॅनलाईन

अनेक वेळा काही किरकोळ कारणांवरून मोठ-मोठे वाद झाल्याच्या अनेक घटना आपण पाहातेच. अशाच एका क्षुल्लक कारणावरून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हाॅर्न वाजवल्याच्या किरकोळ कारणावरून दुचाकीस्वारांनी एका कारचालकाला चक्क दगडाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सदर घटना ही पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. सदर घटनेत कारचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्या कारचीही तोडफोड झाल्याचे समोर आले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8f1870fe-c881-11e8-a8bd-ed9b8b194e7d’]

गजानन वीर असे या कारचालकाचे नाव असून पिंपरी चिंचवड येथील ताथवडे भागात बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. गजानन वीरकर हे कारने जात होते दरम्यान त्यांनी हाॅर्न वाजवला. परिणामी दुचाकीस्वारांनी ‘हाॅर्न का वाजवतो’ अशा शब्दात दमदाटी केली. वाद होऊ नये म्हणून वीरकर दुर्लक्ष करून पुढे निघून गेले. परंतु दुचाकीस्वारांनी चक्क पाठलाग करून कार अडवली. त्यांना दगडाने मारहाण केली. एवढेच नाही तर त्यांच्या गाडीच्या काचाही फोडल्या. या घटनेत वीरकर चांगलेच जखमी झाले असून त्यांच्या गाडीचेही नुकसान झाले आहे.

ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. वाकड पोलिसांनी या प्रकरणी दुचाकीस्वारांना अटक केली आहे. चारच दिवसांपूर्वी मारहाणीची अशीच एक घटना घडली होती. मोबाईल लुटण्यासाठी पादचाऱ्यांना कोयत्याचा धाक दाखवून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. अशा प्रकारच्या घटना पाहिल्यानंतर शहरात पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही? असा प्रश्नही विचारला जात आहे.

[amazon_link asins=’B07DFPG3NH,B019XSHB7O’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’97140cbb-c881-11e8-893d-cd34e5935952′]