बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात ; कात्रज दरीपुलावरून भरधाव कार कोसळली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई-बंगळूरू महामार्गावर भीषण अपघात झाला असून कात्रज दरीपुलावरून भरधाव वेगातील कार खाली कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान कार रेस्क्यू करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले असून कारमधील दोघांना बाहेर काढण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई बंगळुरू महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. दरम्यान महामार्गावरील कात्रज दरी पुलावरून आज सकाळी एक भरधाव वेगातील कार खाली कोसळली. ही घटना तेथून जाणाऱ्या वाहनचालकांनी पाहिली. त्यावेळी त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस आणि अग्निशमन दलाची एकाच वेळी धांदल उडाली. दरम्यान पोलीसांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे. तर अग्निशमन दलाचे जवान रेस्क्यू व्हॅन घेऊन घटनास्थळी दाखल झाले तोवर कारमधील दोघेही बाहेर पडले होते. कार पुण्यातील असल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले.

Loading...
You might also like