बायकोला चारचाकी शिकवणं पडलं महागात, गाडी थेट ८ फूट खड्ड्यात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापुरातील राजारामपुरी महापालिकेच्या शाळा क्रमांक ९ च्या ग्राउंडवर सध्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या मैदानावर पत्नीला चारचाकी गाडी शिकवत कार थेट पाईपलाईन साठी खोदण्यात आलेल्या ८ फूट खड्ड्यात जाऊन पडली. या अपघातात शिकवू चालक असणारी महिला किरकोळ जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून मिळते आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बायकोला चार चाकी गाडी शिकवण्यासाठी हुंडाई कंपनीची ग्रँड आय १० घेऊन पतीदेव बायकोला घेऊन घरातून बाहेर पडले… राजरामपुरीत महापालिकेची शाळा क्रमांक ९ च्या ग्राउंडवरही पोहचले.. सध्या या ग्राउंड वर कोल्हापूर महापालिकेने पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू केलं आहे. यासाठी जवळपास ८ फूट खोल आणि ६ फूट रुंद खड्डा खनला आहे. हे काम सुरू असताना नवऱ्याने बायकोला गाडी चालवण्यासाठी बसवलं आणि ड्रायव्हर शेजारी असणाऱ्या सीटवर जाऊन पतीदेव विराजमान झाले… बायकोने गाडीचा स्टार्टर मारला आणि गाडी पुढं जाऊन बंद पडली. यावेळी पुन्हा स्टार्टर मारला आणि एक्सलेटर वर पाय दाबून राहिल्याने गाडी समोरील खड्डा उकरलेल्या मुरामला धडकली आणि ८ फूट खड्ड्यात जाऊन पडली.. यात शिकाऊ चालक असणाऱ्या पत्निला नवऱ्याने सुखरूप बाहेर काढलं. आणि थेट घरी पाठवलं. यानंतर तब्बल तासभर क्रेन च्या मदतीने कार खड्ड्यातून वर काढण्यात आली. या अपघातात पत्निला किरकोळ मार लागल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे.

खंर तर शाळांची मैदाने ही मुलांना खेळण्यासाठी असतात आणि अशा ठिकाणी गाडी शिकवणं कितपत योग्य आहे असा सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Loading...
You might also like