कुदळवाडी-मोशी स्पाइन रोडवर कारला आग

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – सीएनजीवर चालणाऱ्या कारमध्ये असलेल्या जड डब्बा घासल्याने गॅस लीक झाला, त्यातून भरगाव रस्त्यावरच कारने पेट घेतला. ही घटना कुदळवाडी-मोशी स्पाइन रोडवर आज दूपारी साडेबारा वाजणाच्या सुमारास घडली. शहरात महिन्याभरातील कारला आग लागण्याची तिसरी घटना आहे.

कुदळवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, जयंत खडके यांची काळ्या कलर असलेली फियाट कंपनीची वाहन क्रमांक MH12 DS 9583 कार कुदळवाडी-मोशी स्पाइन रोडवर असलेल्या उड्डाणपूलाखालून चिंचवडच्या दिशेने जात होती. त्यावेळी गॅस लिकेज झाल्याने भर रस्त्यावर अचानक पेट घेटला. खडकेंनी प्रसंगावधान घेत कार रस्त्याच्या कडेला लावली. त्यानंतर कारची आग वाढल्याने कार जळून खाक झाली. धूरचा प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने काही सर्तक नागरिकांनी अग्निशामकाला घटना कळवली. दरम्यान अग्निशामक शामक दलाला माहिती कळताच मुख्य अग्निशामक शामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवानं कोणतीही जिवीतहाणी झाली नाही. घटना दाखल करण्याचे काम सूरू आहे.

महत्वाच्या बातम्या

स्वच्छ आणि सुंदर TOP 10 मध्ये राज्यात ‘हे’ शहर नंबर 1

मार्व्हल स्टुडिओच्या आगामी चित्रपटात बप्पी लहरींचं गाणं ?

बँकेची फसवणूक करून ९ महिन्यांपासून फरार असलेला अटकेत

जमीनीच्या वादातुन शेतातील ऊस पेटवला