Video : चली तो चाँद तक, नही तो ; युवकांना वाढिवपणा नडला, समुद्राच्या लाटांवर कार ‘स्वार’

मुंबई : पालघरच्या जवळ असणाऱ्या समुद्रकिनाऱ्यावरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक कार समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन हेलकावे खाताना दिसत आहे. व्हिडीओत दोन लोक कारच्या मागे धावताना देखील दिसत आहेत. समुद्राच्या लाटांवर हेलकावे खात असलेली कार आणि त्या कारच्या मागे धावत असलेले युवक असा हा व्हिडीओ सोशलमीडियावर खूप व्हायरल होत आहे. हि कार कोणाची आहे आणि समुद्रकिनारी कसकाय पोहचली हे अजून स्पष्ट झालेले नाही.

कारच्या मागे पळणारे दोन युवक कारला समुद्रात जाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. असं म्हंटले जात आहे की, समुद्र किनारी फेरफटका मारायला गेलेली ही कार समुद्राच्या वाळूमध्ये फसली. कार वाळूमध्ये फसल्यामूळे ती समुद्राच्या लाटांच्या तावडीत सापडली. नंतर ही कार वाचविण्यासाठी प्रयत्न चालू झाले. भरतीच्या लाटांमुळे ही कार समुद्रामध्ये ओढली गेली.

ही कार लाटांच्या तावडीतून बाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टरची मदत घेण्यात आली. ट्रॅक्टरला आणि कारला दोरी बांधून ही कार बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले पण निर्सगाच्या शक्तीपुढे हे प्रयत्न अपुरे पडले. अखेर, भरती ओसरल्यानंतर कारला लाटांच्या तावडीतून सोडविण्यास यश मिळाले.