पुणे – बंगलुरु महामार्गावर कारची ऊसाच्या ट्रॉलीला धडक, महिला ठार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे – बंगलुरु महामार्गावर भरधाव जाणाऱ्या कारने ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरात धडक दिली असून त्यात एक महिला ठार झाली असून चार महिला जखमी झाल्या आहेत. हा अपघात कोल्हापूर सांगली फाट्याजवळील महाडिक बंगल्यासमोर पहाटे पावणे दोन वाजता घडला.

सविता बिडकेहाले (वय ५२, रा़ चिकोडी) असे मृत्यु पावलेल्या महिलेचे नाव आहे.  याबाबत मिळलेल्या माहितीनुसार पुणे बंगलुरु महामार्गावर पुण्याकडून कोल्हापूरच्या दिशेने कार जात होती. कारमधील सर्व जण इचलकरंजीला जात असल्याची माहिती मिळाली. यावेळी महामार्गावरील महाडिक बंगल्यासमोर कारने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिली.

त्यात कारचा पुढचा भाग पुर्णपणे चेपला गेला आहे. या अपघातात दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून दोघींना मुक्का मार बसला आहे. जखमींना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारचालक वैभव बडबडे हाही गंभीर जखमी झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like