अखेर पोलीस बनण्याचे स्वप्न अधुरेच…

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – परभणी येथील पूर्णा तालुक्यातील मालेगाव येथे राहणाऱ्या चौघा तरुणांना कारने उडवल्याची घटना घडली  आहे. कारने चिरडल्यामुळे दोघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस भरतीच्या तयारीकरिता हे तरुण सकाळी रनिंगसाठी जात होते तेव्हा या चौघांना कारने उडवल्याची घटना घडली. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. आणि दोघे  गंभीर जखमी झाले आहेत. सोनू साबळे (वय 18 वर्ष) आणि गोविंदा साबळे (वय 21 वर्षे) अशी मृत तरुणांची नावं आहेत.

जाहिरात

पूर्णा तालुक्यातील माटेगाव इथल्या पूर्णा रोडवर आज पहाटे पाच ते सव्वापाचच्या सुमारास ही घटना घडली. कारने आधी सोनू आणि गोविंदा यांना चिरडलं. त्यानंतर व्यायाम करणाऱ्या विकास साबळे आणि कुणाल साबळे यांनाही कारने उडवलं. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पूर्णा पोलिसानी पंचनामा करुन गुन्हा दाखल केला आहे. तर या घटनेनंतर कारचालक पसार झाला आहे. कारचालकाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.”

जाहिरात

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like