कमी चालवत असाल कार तर प्रीमियममध्ये मिळवू शकता सवलत, जाणून घ्या कसा मिळवू शकता चांगला Car Insurance

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Car Insurance | कार यूजर्स जर खुप कमी ड्राईव्ह करत असतील आणि तरी सुद्धा नॉर्मल रेटवर कार इन्श्युरन्स (car insurance) खरेदी करत असतील तर तुमच्यासाठी तोट्याचा सौदा आहे. कारण इन्श्युरन्स सेक्टरच्या नियमानुसार, जी कार कमी धावते, तिच्याबाबतीत दुर्घटनेची शक्यता कमी असते.

 

यासाठी अशा कारचा इन्श्युरन्स नॉर्मल रेटपेक्षा कमी किमतीचा आहे. जर तुम्हाला याबाबत काही माहिती नसेल तर चिंता करण्याची गरज नाही. कारण सलवतीत कशा प्रकारे कारसाठी इन्शुरन्स खरेदी करावा ते जाणून घेवूयात…

 

ड्राइव्हिंग रेकॉर्ड आवश्य तपासा –
तुम्ही स्वताला प्रश्न विचारू शकता की, तुमचा ड्रायव्हिंग रेकॉर्ड कसा आहे. उदाहरणार्थ तुमच्या कारचा मागील वर्षांमध्ये किती वेळा अपघात झाला आहे. ट्रॅफिक नियम तोडले आहेत का. याशिवाय तुम्ही निष्काळजीपणे किंवा नशेत केव्हा ड्रायव्हिंग केली आहे. जर यापैकी तुमच्या बाबतीत काही घडले असेल तर तुमच्या इन्श्युरन्सचा क्लेम वाढू शकतो. (Car Insurance)

 

तसचे जर तुम्ही मागील वर्षांमध्ये इन्श्युरन्स कंपनीकडे कोणताही क्लेम केला नसेल तर तुमचा इन्श्युरन्स प्रीमियम कमी होऊ शकतो. याशिवाय अनेक इतर कारणे सुद्धा आहे, ज्याद्वारे तुमचा इन्शयुरन्स क्लेम कमी होऊ शकतो.

 

क्रेडिट स्कोअरचा सुद्धा इन्श्युरन्स प्रीमियमवर होतो परिणाम –
तुमच्या क्रेडिट स्कोअरचा परिणाम तुमच्या पर्सनल इन्श्युरन्स स्कोअरवर सुद्धा होतो. क्रेडिट स्कोअरचा वापर तुमच्याशी संबंधीत जोखीमीचे आकडे जाणून घेण्यासाठी केला जातो.

 

जर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल तर कारच्या इन्श्युरन्सचा प्रीमियम सुद्धा वाढू शकतो. यासाठी प्रयत्न करा की, तुमचा क्रेडिट स्कोअर कधीही 750 च्या खाली येऊ नये.

ड्रायव्हिंग स्टाईल सुद्धा एक कारण –
जर तुम्ही खुप रफ ड्रायव्हिंग करत असाल तर तुमच्या बाबतीत दुर्घटनेची शक्यता जास्त असते.
यासोबतच जर तुम्ही कमी ड्रायव्हिंग करत असाल तर याबाबत इन्श्युरन्स कंपनीला आवश्य सांगा.
कारण गाडी कमी चालवल्याने तुम्हाला प्रीमियमचा कमी दर मिळवण्याचा अधिकार मिळू शकतो.

 

नो क्लेम बोनस (NCB) –
एनसीबी एक डिस्काऊंट आहे जे सामान्यपणे देय प्रीमियमवर 20 ते 50 टक्केपर्यंत
असते याचा दावा पॉलिसी खरेदी करताना करता येऊ शकतो,
तसेच क्लेम-फ्री रेकॉर्ड बनवू ठेवून यासाठी दावा करता येऊ शकतो.
ही विमाकर्त्याकडून पॉलिसीधारकाला देण्यात येणारी सूट आहे,
जी केवळ पॉलिसीच्या रिन्यूअलवर उपलब्ध होते.

 

लक्षात घेण्यासारखी बाब ही आहे की, NCB पॉलिसी धारकाशी संबंधीत आहे, कारसंबंधीत नाही.
यासाठी जर तुम्ही पॉलिसीच्या रिन्यूअलच्या वेळी एखाद्या इतर विमाकर्त्याकडे जातात किंवा
जर तुम्ही आपल्या सध्याच्या कार बदलून एक नवीन कार खरेदी करत असाल तर तुम्ही तुमचा एनसीबी कायम ठेवू शकता.

 

Web Title :- Car Insurance | drive less car then you can get concession in premium know how else you can get car insurance

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pawandeep Rajan | अरुणिता कांजीलालला सोडून दुसरीसोबत रोमान्स करताना दिसला पवनदीप राजन, VIDEO पाहून चाहते थक्क झाले

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 334 सक्रिय रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 83 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी