Car Loan | सहजपणे पाहिजे असेल कार लोन तर ‘या’ 6 गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होऊ शकते नुकसान; जाणून घ्या

नवी दिल्ली : Car Loan | जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. सहजपणे कार लोन (Car Loan) घ्यायचे असेल आणि कोणत्याही नुकसानी पासून दूर राहायचे असेल तर काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. या गोष्टी कोणत्या ते जाणून घेवूयात…

1. लोन घेण्यापूर्वी बजेट तयार करा

कार खरेदी करण्यापूर्वी बजेट ठरवा. कोणती कार घ्यायची ते ठरवा. कार इन्श्युरन्स, पेट्रोल-डिझेलचा खर्च, रिपेअर खर्च, डेप्रिसिएशन इत्यादी खर्चाचा विचार करा.

2. चांगला क्रेडिट स्कोअर मेंटेन करा

कार लोन घेण्यासाठी चांगला क्रेडिट स्कोअर आवश्यक असतो. यामुळे स्वस्त आणि सहजपणे लोन मिळू शकते. चांगल्या क्रेडिट स्कोअरसाठी क्रेडिट कार्ड आणि इतर कर्जाची परतफेड वेळेवर करा.

3. कोणती कार घ्यायची ते अगोदर ठरवा

घाईघाईत कार घेऊ नका, कोणती कार घ्यायची ते अगोदर ठरवा. सर्वात चांगली डील कुठे उपलब्ध आहे ते पहा. गरजेनुसार कार निवडा, असे तज्ज्ञ सांगतात. एकाच फीचरची एखाद्या कंपनीच्या स्वस्त ऑफरमध्ये मिळत असेल तर ती निवडा. यामुळे कमी कर्जात गाडी घेतल्याने ईएमआयचा भार कमी होईल.

4. डाऊनपेमेंट जेवढे जास्त तेवढे चांगले

कार खरेदी करताना डाऊन पेमेंट जेवढे जास्त असेल तेवढा ईएमआयचा भार कमी होईल.

5. लोनचा कालावधी छोटा ठेवा

बहुतांश बँका कार लोन देताना त्याचा कालावधी जास्त ठेवण्याचा प्रयत्न करतात. बँकांचा उद्देश असतो की,
यामुळे तुमचा इएमआय कमी राहील. परंतु लक्षात ठेवा इएमआय कमी असेल तरी यामुळे तुम्ही बँकेला जास्त पैसे देता.

6 वेळेवर ईएमआय भरा

लोन घेतल्यानंतर वेळेवर जबाबदारीने ईएमआय भरा. यामुळे क्रेडिट स्कोअर चांगला राहील तसेच बँकेसोबत
एक ग्राहक म्हणून चांगले नाते राहील. एक्सपर्ट सांगातात की, कर्जाच्या बाबतीत ग्राहकांनी शिस्तबद्ध दृष्टीकोन
ठेवला पाहिजे. कर्ज जेवढ्या लवकर संपेल तेवढे चांगले.

हे देखील वाचा

SEBI नं गुंतवणुकदारांसाठी 17 मुद्यांव्दारे जारी केली मार्गदर्शक तत्त्वे, जाणून घ्या डिटेल अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

Pune News | ‘विचलीत न होता काँग्रेस कार्यकर्ते नेटाने लढतील’ – माजी आमदार मोहन जोशी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Car Loan | car loan if you want to get car loan easily then keep-these 5 things in mind otherwise there may be loss

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update