कार चोरणारा पुणे पोलिसांकडून गजाआड

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड परिसरातून कार चोरणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि.१०) करण्यात आली. या कारवाईत चोरट्याकडून एक स्विफ्ट (एमएच १२ डीवाय ४२४५) कार जप्त करण्यात आली आहे.
सलमान रुस्तम शेख (वय-१९ रा. कुदळवाडी, बालगरे वस्ती, कुदळवाडी पोलीस चौकी मागे, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’570b71ef-cd47-11e8-905d-0fc95cf1048f’]

वाहनचोरी विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी विशाल शिर्के यांना एक तरुण चोरी केलेली कार वापरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपी सलमान शेख याचा शोध घेऊन सापळा रचून अटक केली. त्याच्याकडे असलेल्या स्विफ्ट कारची चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने एप्रिल महिन्यात पिंपळेगुरव येथून ही कार चोरल्याची कबुली दिली. सांगवी पोलीस ठाण्यात कार चोरीचा गुन्हा दाखल असून पोलिसांनी १ लाख ५० हजार रुपये किंमतीची कार जप्त केली आहे.

[amazon_link asins=’B06XN6BY5V,B01LVXMWNU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’63aa7e9e-cd47-11e8-b950-87ea90880663′]

ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनचोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड, कर्मचारी जितेंद्र तुपे, सुनिल पवार, तुकाराम नाळे, सुहास कदम, विशाल शिर्के, शंकर संपते, हनुमंत बोराटे, सागर घोरपडे, मोहन येलपले यांच्या पथकाने केली.

बनावट दागिने तारण ठेवून लाखोंचं कर्ज घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

२ बुलेटची चोरी

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन बुलेट चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. शंकर राठोड यांनी दिघी पोलीस ठाण्यात तर शैलेश सावंत यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या दोन्ही घटनेत चोरट्यांनी १ लाख ८० हजार रुपयांच्या दोन बुलेट चोरुन नेल्या आहेत. शंकर राठोड यांनी त्यांची १ लाख रुपये किंमतीची बुलेट सोसायटीच्या पार्कींगमध्ये पार्क केली होती. रात्री आठच्या सुरमास ते पार्किंगमध्ये आले असता त्यांना पार्क केलेली बुलेट दिसली नाही. त्यांनी दिघी पोलीस ठाण्यात बुलेट चोरीची फिर्याद दिली आहे. शैलेश सावंत यांनी ८० हजार रुपये किंमतीची बुलेट घरासमोर उभी केली होती. सकाळी आठच्या सुमारास ते बाहेर जाण्यासाठी घराबाहेर पडले त्यावेळी त्यांना बुलेट दिसली नाही. त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.